TRENDING:

Pune Crime: पुण्यातील त्या फ्लॅटमध्ये जगायचं स्वप्न अधुरंच; घर न मिळाल्यानं निवृत्त अधिकाऱ्यानं त्याच इमारतीवरून उडी घेत संपवलं आयुष्य

Last Updated:

कराराप्रमाणे, इमारत पूर्ण झाल्यावर महाजन यांना तिथे फ्लॅट मिळणे अपेक्षित होते. मात्र, सात मजली इमारत दिमाखात उभी राहिली तरी बिल्डरने त्यांना फ्लॅट देण्यास नकार दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : ज्या जागेवर स्वतःचं स्वप्नातील घर उभं राहिलं, त्याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बाणेरमध्ये घडली आहे. करारानुसार हक्काचा फ्लॅट न देता फसवणूक केल्याने हताश झालेल्या नरेश उमाकांत महाजन (वय ६९) यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी पोलिसांनी दोन बांधकाम व्यावसायिकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
निवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या (AI Image)
निवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

मूळचे अंबरनाथचे रहिवासी असलेले नरेश महाजन हे महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकारी होते. त्यांनी बाणेरमधील आपली जागा विकसित करण्यासाठी 'स्वीटी असोसिएट्स'च्या जयंतीलाल ओसवाल यांना दिली होती. कराराप्रमाणे, इमारत पूर्ण झाल्यावर महाजन यांना तिथे फ्लॅट मिळणे अपेक्षित होते. मात्र, सात मजली इमारत दिमाखात उभी राहिली तरी बिल्डरने त्यांना फ्लॅट देण्यास नकार दिला.

advertisement

बिल्डरची अरेरावी आणि टोकाचं पाऊल

१६ फेब्रुवारी रोजी महाजन अंबरनाथहून पुण्यात आले होते. त्यांनी बिल्डरकडे आपल्या हक्काच्या घराची मागणी केली, मात्र जयंतीलाल आणि रिषभ ओसवाल यांनी त्यांना फ्लॅट देण्याऐवजी उलट धमकावलं. आपली फसवणूक झाल्याचं आणि हक्काचं घर हातातून गेल्याचं पाहून महाजन खचले. त्याच इमारतीच्या सातव्या मजल्यावर जाऊन त्यांनी दुपारी १२ च्या सुमारास उडी मारली.

advertisement

बिल्डरवर गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुण्यात 'हे' पहिल्यांदाच घडतंय, Video
सर्व पहा

याप्रकरणी महाजन यांचा मुलगा मयूर महाजन यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जयंतीलाल ताराचंद ओसवाल (५६) आणि रिषभ ओसवाल (३०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हक्काच्या घरासाठी एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागल्याने पुणेकरांमध्ये बिल्डर लॉबीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुण्यातील त्या फ्लॅटमध्ये जगायचं स्वप्न अधुरंच; घर न मिळाल्यानं निवृत्त अधिकाऱ्यानं त्याच इमारतीवरून उडी घेत संपवलं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल