TRENDING:

खोटं कारण सांगून मालकाकडून घेतली सुट्टी; सत्य समजताच सलून व्यावसायिकानं कामगाराला संपवलं, पुणे हादरलं

Last Updated:

महंमद कुरेशी गेल्या दोन वर्षांपासून बिबवेवाडीतील एका सलूनमध्ये कामाला होता. काही दिवसांपूर्वी त्याने 'गावाला जातो' असे सांगून मालकाकडून महिनाभराची सुट्टी घेतली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात व्यावसायिक स्पर्धेतून एका १८ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. स्वतःचे स्वतंत्र सलून दुकान सुरू केल्याच्या रागातून जुन्या मालकाने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून एका तरुणाला मृत्यूच्या दारात ढकललं. महंमद फिरोज कुरेशी (वय १८) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
मालकाकडून कामगाराची हत्या (AI Image)
मालकाकडून कामगाराची हत्या (AI Image)
advertisement

नेमका वाद काय?

मूळचा प्रयागराज येथील असलेला महंमद कुरेशी गेल्या दोन वर्षांपासून बिबवेवाडीतील एका सलूनमध्ये कामाला होता. काही दिवसांपूर्वी त्याने 'गावाला जातो' असे सांगून मालकाकडून महिनाभराची सुट्टी घेतली होती. मात्र, गावाला न जाता त्याने त्याच परिसरात आपले स्वतंत्र दुकान सुरू केले. इतकेच नाही तर, जुन्या दुकानातील ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना आपल्या नवीन दुकानात येण्याचे आवाहनही त्याने केले होते.

advertisement

आपला जुना कामगार आता आपला 'स्पर्धक' बनला आहे आणि तो आपले ग्राहक पळवत आहे, ही बाब जुन्या सलून मालकाच्या जिव्हारी लागली. यावरून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मालक आणि त्याच्या साथीदारांनी महंमदला गाठले आणि त्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती की, १८ वर्षांच्या या तरुणाचा जागीच जीव गेला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

या घटनेमुळं बिबवेवाडी परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. भररस्त्यात किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या झाल्यानं पोलिसांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
खोटं कारण सांगून मालकाकडून घेतली सुट्टी; सत्य समजताच सलून व्यावसायिकानं कामगाराला संपवलं, पुणे हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल