TRENDING:

Pune Crime : इंस्टाग्रामवर ओळख, प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं अन् अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, हायवेवरच्या लॉजवर घेऊन जायचा अन्...

Last Updated:

Pune Crime News : तिला प्रपोज केले आणि प्रेमाचे नाटक रचलं. मुलीने सुरुवातीला स्पष्ट नकार देऊनही आरोपीने इंस्टाग्राम आणि फोनवरून तिला सतत त्रास देणं सुरूच ठेवलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Crime News : पुण्याच्या खेड तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला आहे. वैभव शिवाजी मुसळे (रा. कडूस, ता. खेड) असे या प्रकरणातील नराधम आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी सध्या आपल्या शिक्षणासाठी नारायणगाव येथे वास्तव्यास असून, तिने दिलेल्या फिर्यादीनंतर खेड पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची नोंद केली आहे.
Pune Crime Meet on Instagram get trapped in a love and repeatedly abuse
Pune Crime Meet on Instagram get trapped in a love and repeatedly abuse
advertisement

इंस्टाग्रामवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वैभवने इंस्टाग्रामवरून पीडित मुलीशी संपर्क साधला होता. तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट केल्यानंतर त्याने तिला प्रपोज केले आणि प्रेमाचे नाटक रचलं. मुलीने सुरुवातीला स्पष्ट नकार देऊनही आरोपीने इंस्टाग्राम आणि फोनवरून तिला सतत त्रास देणं सुरूच ठेवलं. ऑगस्ट 2025 मध्ये त्याने मुलीला पहिल्यांदा मंचर येथे बोलावलं आणि तिथून आपल्या चारचाकी गाडीने पुणे-नाशिक महामार्गावरील एका लॉजवर नेलं.

advertisement

जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले

जैदवाडी येथील स्काय लॉजमध्ये नेऊन आरोपीने मुलीवर पहिल्यांदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या घटनेने मुलगी प्रचंड हादरली होती आणि भीतीपोटी तिने कोणालाही काही सांगितलं नाही. मात्र, आरोपीची हिंमत वाढल्याने त्याने पुन्हा 15 सप्टेंबर 2025 रोजी तिला खेड इथं बोलावलं आणि त्याच लॉजमध्ये नेऊन पुन्हा अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता तो तिला सोशल मीडिया आणि फोनवरून सतत फॉलो करून मानसिक त्रास देत होता.

advertisement

बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान, अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने आपल्या मामाच्या मदतीने खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी वैभव मुसळेविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेच्या अगतिकतेचा फायदा घेऊन वारंवार तिचे शोषण केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो (POCSO) कायद्यासह बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल केले असून तपास अधिकारी आता त्या लॉजचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : इंस्टाग्रामवर ओळख, प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं अन् अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, हायवेवरच्या लॉजवर घेऊन जायचा अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल