सिंहगड रोड: भरदुपारी मंगळसूत्र लंपास
पहिली घटना सिंहगड रोड परिसरातील सनसिटी रस्त्यावर घडली. येथील एका सोसायटीत राहणाऱ्या ५६ वर्षीय महिला गुरुवारी (१२ फेब्रुवारी) दुपारी कामानिमित्त बाहेर निघाल्या होत्या. सनसिटी रस्त्यावरून पायी जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा करेपर्यंत चोरटे वेगाने पसार झाले होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
विश्रांतवाडी: भाजी मंडईत ज्येष्ठ महिलेला लुटले
दुसरी घटना विश्रांतवाडीतील आळंदी रस्ता परिसरात घडली. येथे भाजी मंडईत आपल्या सुनेसोबत खरेदीसाठी आलेल्या ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. मात्र, या प्रकरणात विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून मुकेश बाबुलाल राठोड (वय २२, रा. नागपूर) या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पुणेकरांसाठी धोक्याची घंटा
शहरात भरवस्तीत आणि गर्दीच्या ठिकाणी देखील महिला सुरक्षित नसल्याचे या घटनांवरून दिसत आहे. विशेषतः पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिला चोरट्यांच्या 'सॉफ्ट टार्गेट' ठरत आहेत.
