चारही आरोपी अल्पवयीन
या हल्ल्याबाबत शुभम घोटणे (22, रा. भारती विद्यापीठ) या तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. हल्ल्यात शुभम घोटणे याच्यासह आर्यन गायकवाड आणि अथर्व मारणे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, या गुन्ह्यात सामील असलेले चारही आरोपी अल्पवयीन आहेत आणि जखमी शुभम घोटणे यांच्या ओळखीचे आहेत. साधारण दोन वर्षांपूर्वी आरोपी आणि घोटणे यांच्यात किरकोळ वाद झाला होता.
advertisement
गप्पा मारत थांबले अन्...
गुरुवारी रात्रीच्या वेळी घोटणे आणि त्याचे मित्र गायकवाड व मारणे हे मोहननगर परिसरात गप्पा मारत थांबले होते. याच वेळी चारही आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. जुन्या वादातून त्यांनी घोटणे आणि त्याच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं?
समर्थ काटे याच्याबरोबर त्यांची दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते. शुभम घोटणे हे आदर्श कॉर्नर येथील किराणा मालाच्या दुकानासमोर 12 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता उभे होते. त्यावेळी समर्थ काटे, मानव ढमाले, यश काटे आणि त्यांचा एक साथीदार हे मोटारसायकलवरुन तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरुन समर्थ काटे याने त्याच्याकडील लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार केला. डोक्यातून रक्त येऊ लागल्याने घाबरुन ते तेथून पळून जात असताना समर्थ काटे याने पुन्हा त्यांच्यावर वार केला. मात्र, कोयत्याचा वार त्यांनी चुकविला. तो त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व मनगटावर खरचटले. त्यावेळी तेथे उभे असलेल्या तरुणांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समर्थ काटे, मानव ढमाले, यश काटे यांनी मिळून त्यांच्याकडील हत्याराने त्यांना देखील मारहाण केली. गर्दी जमा होऊ लागल्यावर समर्थ काटे याने जमलेल्या नागरिकांना धमकाविण्यासाठी त्याने हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरवुन दहशत निर्माण केली.
