TRENDING:

पुणे, मुंबईसह 5 मोठी शहरं, परराज्यातील तरुणी अन् 4 भिंतीआड सुरू होतं घाणेरडं कांड; अखेर वानवडीत 'गेम ओव्हर'

Last Updated:

शहरातील स्पा आणि मसाज सेंटरच्या आडून वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पुणे पोलिसांनी 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: शहरातील स्पा आणि मसाज सेंटरच्या आडून वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पुणे पोलिसांनी 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. सराईत दलाल धनराज शामराव जाधव याच्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई करत त्याची एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट (प्रतिकात्मक फोटो)
वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

पुणे ते मुंबई... आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

धनराज जाधव हा केवळ पुण्यातच नाही, तर पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांत संघटितरित्या हे रॅकेट चालवत होता. परराज्यातील तरुणींना मसाज सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांना देहविक्रीच्या दलदलीत ढकलण्याचे काम तो मोठ्या प्रमाणावर करत होता. त्याच्यावर पुणे, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार अनेक गुन्हे दाखल आहेत.

advertisement

फरार आरोपीला वानवडीत अटक

२०२४ मध्ये वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्पा सेंटरवर छापा टाकल्यानंतर धनराजचे नाव समोर आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठवल्यानंतर १४ जानेवारी २०२५ रोजी त्याचे आदेश निघाले. मात्र, कारवाईची कुणकुण लागताच तो पुण्यातून फरार झाला होता. शनिवारी तो वानवडी परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.

advertisement

पोलीस आयुक्तांचा कडक इशारा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, केळी आणि डाळिंबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

"मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या कोणत्याही अवैध प्रकाराबाबत आमची भूमिका स्पष्ट आणि कठोर आहे. अशा दलालांना समाजात स्थान नसून त्यांची जागा थेट कारागृहातच असेल," असे स्पष्ट संकेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कारवाईतून दिले आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
पुणे, मुंबईसह 5 मोठी शहरं, परराज्यातील तरुणी अन् 4 भिंतीआड सुरू होतं घाणेरडं कांड; अखेर वानवडीत 'गेम ओव्हर'
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल