एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना पुण्यात घडली आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची आंदेकर टोळीने गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना नाना पेठ परिसरात घडली आहे. २०२४ मध्ये याच परिसरात वनराजची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरानंतर ठिकाणही तेच निवडलं आणि आंदेकर टोळीने आयुषवर ३ गोळ्या झाडून खून केला.
advertisement
४ दिवसांपूर्वी प्लॅन फसला
पण, ४ दिवसांपूर्वी म्हणजे, १ सप्टेंबर रोजी आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने एक प्लॅन रचला होता. पण या पोलिसांनी याची कुणकुण लागली. पोलिसांनीही सगळ्यांवर नजर ठेवली आणि आंदेकर टोळीचा डाव हाणून पाडला. त्याचं घडलं असं की, कृष्णा आंदेकरने रुमसाठी 5000 रुपये देऊन काळे याला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठवलं होतं. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता काळेनं वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींच्या घराचे रेकी केली अन् घरं पाहिली. त्याची माहिती काळेने कृष्णाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दिली. त्या वेळी कृष्णाने अमनला पाठवतो, असं काळेला कळवलं. मात्र, अमन आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काळेनं परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं.
कृष्णा फोनच उचलत नसल्याचं पाहिल्यावर काळे याने यश पाटील याला कॉल केला. त्यावेळी पाटीलने काळेला अमनला कॉल करण्यास सांगतो, असं कळवलं होतं. पाटीलने कॉल केल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता काळेला कॉल केला गेला. त्यावेळी सात ते आठ जणांना पाच हत्यारं घेऊन पाठवलं आहे, असं सांगितलं होतं. तर अमनने कॉल करून 'लक्ष ठेवा बाहेर आला की कळवा' असं कळवलं होतं.
त्या दिवशी गेम चुकला अन् आज सापडला
मात्र, पोलिसांना या प्लॅनची टीप मिळाली होती. पोलिसांनी नजर ठेवली एकाला रंगेहात पडकलं. त्यामुळे हा डाव फसला होता. पण आंदेकर टोळी कुणाला मारणार होते, हे तेव्हा कळलं नाही. पण, ५ सप्टेंबर रोजी अखेर आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली.