पुणे शहरात गणरायाच्या विसर्जनाची तयारी सुरू आहे. संध्याकाळी आरतीची लगबग मंडळात सुरू होती. पण अचानक नाना पेठ परिसरात गोळीबाराचा आवाज आला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपी गणेश कोमकरच्या मुलावर गोळ्या झाडल्या. ३ गोळ्या आयुषला लागल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
पोलिसांनी माहिती दिली की, आयुष गणेश कोमकर हा क्लास वरून तो घरी येत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन अज्ञात इसमानी हल्ला केल्याची शक्यता आहे. आयुष हा वनराज आंदेकर हत्येतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा होता. मयत आयुष हा वनराज आंदेकर याचा भाचा होता. आयुष हा क्लास वरून घरी येताना त्याच्या घराखाली बेसमेंटमध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या ६ टिम्स तैनात करण्यात आल्या आहेत. वनराज आंदेकर याची झालेली हत्या आणि आत्ताच्या घटनेचा काही संबंध आहे का या दृष्टीने ही तपास सुरू आहे. या घटनेत ज्याचा सहभाग असेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला सोडला जाणार नाही, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.