नेमकी घटना काय?
पार्वती दराडे (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित विष्णू महादेव पावडे (वय ३२, मूळ रा. परभणी) याला अटक केली आहे. पार्वती आणि विष्णू हे दोघेही ओळखीचे असून एकाच ठिकाणी कामाला होते. शुक्रवारी (२० फेब्रुवारी) दुपारी दोघेही नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले.
advertisement
जंगल गाठलं अन् काटा काढला
दोघेही सोळू येथील निर्जन जंगलात गेले असता, विष्णूने अचानक पार्वतीचा गळा आवळून त्यांची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर पकडलं जाऊ नये म्हणून विष्णूने अतिशय चलाखीनं पुरावा नष्ट करण्याचा कट रचला. त्यानं पार्वतीच्या गळ्यातील ओढणी आणि स्कार्फच्या साहाय्याने त्यांचा मृतदेह एका झाडाला बांधून लटकवला. जेणेकरून, ही आत्महत्या आहे असा लोकांचा आणि पोलिसांचा समज व्हावा.
पोलिसांनी असा उघड केला बनाव
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास आणि चौकशी सुरू केली. तपासाची चक्रे फिरताच विष्णू पावडे याचं नाव समोर आलं आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी यांनी फिर्याद दिली असून, खुनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
