TRENDING:

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! रमजाननिमित्त या भागातील वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Last Updated:

पवित्र रमजान महिन्यानिमित्त कोंढवा भागात होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पवित्र रमजान महिन्यानिमित्त कोंढवा भागात होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. सायंकाळी इफ्तारच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता, दररोज सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील. रमजान महिना संपेपर्यंत ही नवी नियमावली कायम राहणार आहे.
कोंढव्यातील वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
कोंढव्यातील वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
advertisement

रमजानच्या काळात उपवास (रोजा) सोडण्यासाठी खाद्यपदार्थ आणि फळ खरेदीसाठी कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंप, कौसरबाग आणि पारगेनगर भागात नागरिकांची मोठी गर्दी होते. ही गर्दी आणि अरुंद रस्ते यामुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना मदत करण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकही रस्त्यावर तैनात असणार आहेत.

जड वाहनांसाठी 'हे' रस्ते बंद

advertisement

कौसरबाग परिसर: ज्योती हॉटेल चौक ते मेफेअर सोसायटी आणि पारगेनगर या दरम्यान सर्व प्रकारच्या जड वाहनांना (उदा. टँकर, ट्रक) पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

सर्वोदय चौक: सर्वोदय चौकातून कौसरबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही जड वाहनांना प्रवेश मिळणार नाही.

पर्यायी मार्ग कोणते?

वाहनचालकांनी गर्दी टाळण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी खालील मार्गांचा वापर करावा:

advertisement

जड वाहनांसाठी: मेफेअर सोसायटी चौक ते ज्योती हॉटेल चौक असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

इतर वाहने: ज्योती हॉटेल चौक, शीतल पेट्रोल पंप चौक आणि पारगेनगर या मार्गांचा वापर करून प्रवास करू शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! रमजाननिमित्त या भागातील वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल