या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमधील आझादनगर येथील 'सुखाई कॉम्प्लेक्स' सोसायटीत वास्तव्यास आहेत. ५ डिसेंबर रोजी ते काही कामानिमित्त घराला कुलूप लावून परगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून त्यातील सहा लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला.
advertisement
तक्रारदार घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. पोलीस सध्या सोसायटीतील आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत असून चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
पुण्यात इंजिनिअरची फसवणूक
दुसऱ्या एका घटनेत पुण्यातील हिंजवडी परिसरात एका आयटी इंजिनिअरची फसवणूक झाली आहे. घरगुती सामान झारखंडला पोहोचवण्याच्या बहाण्याने सुमारे २३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'EIE मार्केट प्लेस टेक्नॉलॉजी' या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी सामान लंपास करून विश्वासघात केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
