TRENDING:

ते पाणी पिताच खाली कोसळल्या तरुणी; 12 जणी रुग्णालयात दाखल, पुण्यातील MMIT कॉलेजमध्ये खळबळ, काय घडलं?

Last Updated:

विषबाधेची तीव्रता इतकी भीषण होती की, विद्यार्थिनी वसतिगृहातच चक्कर येऊन पडू लागल्या. कॉलेज परिसर सुनसान असूनही, प्रशासनाने आजारी विद्यार्थिनींना रुग्णवाहिका किंवा स्वतःची गाडी उपलब्ध करून दिली नाही

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील लोहगाव येथील 'मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (MMIT) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दूषित पाण्यामुळे चक्क १२ विद्यार्थिनींना विषबाधा झाली असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संताप असून कॉलेज प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पाण्यातून विषबाधा (AI Image)
पाण्यातून विषबाधा (AI Image)
advertisement

पाण्याच्या टाकीत अळ्या अन् पिवळसर पाणी

बाधित विद्यार्थिनींनी दिलेली माहिती अत्यंत विदारक आहे. वसतिगृहातील फिल्टरमधून पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत होते. १० फेब्रुवारी रोजी काही विद्यार्थिनींनी पाण्याच्या टाकीत आणि बादल्यांमध्ये काळ्या रंगाच्या अळ्या पाहिल्या होत्या. याचे फोटो आणि व्हिडिओ कॉलेज प्रशासनाला दाखवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. "जानेवारी महिन्यात तक्रार केली असता केवळ टाकी स्वच्छ केल्याचे नाटक केले गेले, प्रत्यक्षात फिल्टर बदललाच नव्हता," असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

advertisement

विद्यार्थिनी चक्कर येऊन पडल्या

विषबाधेची तीव्रता इतकी भीषण होती की, विद्यार्थिनी वसतिगृहातच चक्कर येऊन पडू लागल्या. कॉलेज परिसर सुनसान असूनही, प्रशासनाने आजारी विद्यार्थिनींना रुग्णवाहिका किंवा स्वतःची गाडी उपलब्ध करून दिली नाही. विद्यार्थिनींना खासगी वाहनाने किंवा एकमेकींच्या मदतीने 'साईश्रद्धा हॉस्पिटल' गाठावे लागले. अक्षरशः जीविताशी खेळ सुरू असतानाही कॉलेज प्रशासन ढिम्म होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

सर्वात गंभीर बाब म्हणजे, उपचारादरम्यान विद्यार्थिनींनी रक्ताच्या चाचणीचे अहवाल मागितले असता कॉलेज कर्मचाऱ्यांनी ते देण्यास टाळाटाळ केली. "रिपोर्ट आमच्याकडे आहेत, ते योग्य वेळी दाखवू," असे सांगून माहिती दडपली जात होती. इतकेच नाही तर, मीडिया किंवा पोलिसांकडे तक्रार केल्यास कारवाई करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
ते पाणी पिताच खाली कोसळल्या तरुणी; 12 जणी रुग्णालयात दाखल, पुण्यातील MMIT कॉलेजमध्ये खळबळ, काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल