पुणे रेल्वे विभागात सध्या पुणतांबा ते कन्हेगाव स्थानकांदरम्यान हे काम 'पीक्यूआरएस' (प्लेसर क्विक रिलेइंग सिस्टीम) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत वेगाने पूर्ण केले जात आहे. विशेष म्हणजे, रेल्वे वाहतूक सुरू असतानाच ठराविक काळाचे ब्लॉक घेऊन अवघ्या ३५ दिवसांत नऊ किलोमीटरचे रूळ बदलण्यात यश आले आहे.
या सुधारणेमुळे भविष्यात प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी या मार्गावर ५२ किलो वजनाचे रूळ वापरले जात होते, ज्यांची जागा आता ६० किलो वजनाच्या अधिक भक्कम रुळांनी घेतली आहे. रुळांची क्षमता आणि गुणवत्ता वाढल्यामुळे रेल्वे गाड्यांचा सरासरी वेग ताशी ११० किलोमीटरवरून १३० किलोमीटरपर्यंत नेणे शक्य होणार आहे. ज्यामुळे पुणे-मनमाड प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच, अल्ट्रासॉनिक टेस्टिंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे रूळ तुटून होणाऱ्या अपघातांना लगाम बसेल आणि अवजड मालगाड्यांच्या वाहतुकीमुळे रुळांना तडे जाण्याचे प्रमाणही कमी होईल. एकदा हे नवीन रूळ बसवले की, पुढील १५ ते २० वर्षे या मार्गावर पुन्हा रूळ बदलण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे देखभालीसाठी लागणारा वेळ वाचून गाड्यांचे वेळापत्रकही अधिक अचूक राहील.
advertisement
