TRENDING:

प्रवास जलद होणार, पण पुणेकरांना 'मोठी किंमत' मोजावी लागणार; मेट्रोच्या विस्तारासाठी हजारो झाडं पाडणार!

Last Updated:

मेट्रोच्या विविध विस्तारित मार्गांच्या कामात सुमारे २३८६ झाडे अडथळा ठरत असून ती तोडली जाणार आहेत. वृक्ष संरक्षण कायद्यानुसार या बदल्यात तब्बल ४१ हजार झाडे लावणे महामेट्रोवर बंधनकारक आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा ठरू पाहणाऱ्या पुणे मेट्रोच्या विस्तार कामासाठी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे. मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास जरी जलद आणि सुखाचा होत असला तरी वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचं मात्र मोठं नुकसान होणार आहे. मेट्रोच्या विविध विस्तारित मार्गांच्या कामात सुमारे २३८६ झाडे अडथळा ठरत असून ती तोडली जाणार आहेत. वृक्ष संरक्षण कायद्यानुसार या बदल्यात तब्बल ४१ हजार झाडे लावणे महामेट्रोवर बंधनकारक आहे. मात्र या अवाढव्य वृक्षलागवडीसाठी पुण्यात पुरेशी मोकळी जागाच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
मेट्रोच्या विस्तारासाठी हजारो झाडं पाडणार! (फाईल फोटो)
मेट्रोच्या विस्तारासाठी हजारो झाडं पाडणार! (फाईल फोटो)
advertisement

जागेसाठी महामेट्रोची धावपळ

महामेट्रोने या वृक्षलागवडीसाठी आवश्यक असलेल्या जागेची विचारणा करण्यासाठी विविध सरकारी संस्थांना पत्रे पाठवली आहेत. पुण्यासारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात मोकळ्या जागांची मोठी टंचाई आहे. त्यामुळे 'कागदावर' ४१ हजार झाडांचा आकडा मोठा वाटत असला, तरी प्रत्यक्षात ही झाडे लावायची कुठे, असा मोठा पेच प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

जुना अनुभव धक्कादायक

advertisement

याआधी मेट्रोच्या पहिल्या दोन मार्गिकांच्या कामावेळी सुमारे २१ हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र, देखभालीचा अभाव, अपुरा पाणीपुरवठा आणि नियोजनाच्या अभावामुळे यातील बहुतांश झाडे जगलीच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे केवळ नवीन झाडे लावल्याची आकडेवारी दाखवून पर्यावरणीय नुकसान भरून निघणार नाही, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

advertisement

प्रौढ झाडांची जागा छोटी रोपे कशी घेणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

पर्यावरण अभ्यासकांच्या मते, मेट्रोसाठी तोडली जाणारी झाडे ही अनेक वर्षे जुनी आणि मोठी आहेत. त्यांचे पर्यावरणीय योगदान (ऑक्सिजन, सावली, जैवविविधता) नव्याने लावलेली छोटी रोपे तात्काळ भरून काढू शकत नाहीत. त्यातच पुण्यात जागेची टंचाई असल्याने विखुरलेल्या स्वरूपात लागवड झाल्यास त्यांचे संगोपन करणे महामेट्रोसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
प्रवास जलद होणार, पण पुणेकरांना 'मोठी किंमत' मोजावी लागणार; मेट्रोच्या विस्तारासाठी हजारो झाडं पाडणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल