TRENDING:

Pune-Mumbai Bullet Train: पुणे-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन कधी होणार सुरू? 'डेडलाईन' अन् 'प्लॅन' समोर

Last Updated:

पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आणणाऱ्या 'हायस्पीड रेल्वे' प्रकल्पाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आणणाऱ्या 'हायस्पीड रेल्वे' प्रकल्पाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे. अर्थसंकल्पोत्तर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची 'टाइमलाईन' आणि भविष्यातील नियोजनाचा आराखडा सादर केला.
पुणे-मुंबई बुलेट ट्रेन अपडेट (AI  Image)
पुणे-मुंबई बुलेट ट्रेन अपडेट (AI Image)
advertisement

प्रकल्प कधी पूर्ण होणार?

रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, नवीन मोठे रेल्वे प्रकल्प सुरू केल्यानंतर ते पुढील ५ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे मंत्रालयाने ठेवले आहे. मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम आता पहिल्या टप्प्यात सुरू झाले असून, नियोजित वेळेत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यावर सरकारचा भर आहे. मध्यम स्वरूपाचे प्रकल्प ३ वर्षात, तर हायस्पीडसारखे भव्य प्रकल्प ५ वर्षांत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

advertisement

दर १५ मिनिटांनी सुटणार ट्रेन!

प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता, या मार्गावर केवळ ट्रेन चालवणेच नाही तर ती किती वारंवारतेने उपलब्ध असेल, याचेही नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या वेळेत दर १५ ते २० मिनिटांच्या अंतराने बुलेट ट्रेन सोडण्याचे नियोजन असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना वेळेचे बंधन राहणार नाही आणि लोकलप्रमाणेच बुलेट ट्रेनची सुविधा उपलब्ध होईल.

advertisement

महाराष्ट्रासाठी २३,९२३ कोटींची तरतूद

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी २३ हजार ९२३ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. सध्या राज्यात सुमारे १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे विविध रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हायस्पीड रेल्वेमुळे पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार असून, या मार्गालगत औद्योगिक आणि निवासी क्षेत्राचा मोठा विकास होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune-Mumbai Bullet Train: पुणे-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन कधी होणार सुरू? 'डेडलाईन' अन् 'प्लॅन' समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल