TRENDING:

Pune News: पुणे महापालिकेत थरार! कर विभागात रिव्हॉल्व्हर काढून अधिकाऱ्यांना धमकावलं, धक्कादायक प्रकार समोर

Last Updated:

पुणे महापालिकेच्या कर विभागात झालेल्या या घटनेमुळे महापालिकेच्या कार्यालयीन सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत  पोते, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : पुणे महापालिकेच्या कर आकारणी विभागात शुक्रवापी एक खळबळजनक प्रकार घडला आहे. कर आकारणी अधिक झाल्याच्या रागातून एका व्यक्तीने थेट रिव्हॉल्व्हर काढत स्वतःचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिल्याने कार्यालयात एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महेंद्र लोणकर असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी सुमारे 3.15 वाजता पुणे महापालिकेच्या कर विभागात घडली. महेंद्र लोणकर कर आकारणी अधिक लावण्यात आल्याच्या तक्रारीसाठी महापालिकेत आले होते. सुरुवातीला त्याने अधिकाऱ्यांशी वाद घालत आपली तक्रार मांडली. मात्र काही वेळातच त्याचा पारा चढला आणि त्याने कार्यालयात आरडाओरड सुरू केली. उपस्थित कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी ते अधिक आक्रमक झाले.

advertisement

कर्मचारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट

वाद चिघळल्यानंतर लोणकर यांनी अचानक इमारतीवरून उडी मारून जीव देण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता त्याने खिशातून रिव्हॉल्व्हर काढून “मी इथेच स्वतःला संपवून टाकीन,” असा इशारा दिला. हे दृश्य पाहून कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. काही वेळासाठी संपूर्ण कर विभागात गोंधळ उडाला.

लोणकरकडील रिव्हॉल्व्हर जप्त

advertisement

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि लोणकरकडील रिव्हॉल्व्हर जप्त केली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याविरोधात शस्त्र कायदा तसेच धमकी देण्यासंदर्भातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'घरच्यांनी घराबाहेर काढलं, तर तू तिला कसा सांभाळशील?' शाम अन् गीताची युनिक लव्हस
सर्व पहा

लोणकरकडे रिव्हॉल्व्हर कुठून आली, त्याच्याकडे शस्त्र परवाना आहे का, तसेच तो शस्त्र बाळगण्यास अधिकृत आहे की नाही, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत कर आकारणीबाबतचा वाद हा घटनेमागील मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या कार्यालयीन सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणे महापालिकेत थरार! कर विभागात रिव्हॉल्व्हर काढून अधिकाऱ्यांना धमकावलं, धक्कादायक प्रकार समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल