'येथे' सुरू होणार नवीन कार्यालय
गेल्या अनेक वर्षांपासून मुंढवा येथील 'झीरो वन' (पिंगळे वस्ती) इमारतीत हे केंद्र कार्यरत होते. मात्र, वाढती गर्दी आणि अत्याधुनिक सुविधांची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने हे कार्यालय हलवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कार्यालय आता 'मॉटक्लेयर बिल्डिंग', कार्यालय क्र. १०१-१०२, पहिला मजला, बाणेर-पाषाण लिंक रस्ता, पाषाण येथे सुरू होईल. बाणेर, पाषाण, औंध, बावधन आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नागरिकांसाठी हे केंद्र अत्यंत सोयीचे ठरणार आहे.
advertisement
अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांसाठी सूचना
ज्या नागरिकांनी ३० मार्च २०२६ किंवा त्यानंतरच्या तारखेसाठी मुंढवा केंद्राची अपॉइंटमेंट आधीच घेतली आहे, त्यांना आता नवीन केंद्रावर (पाषाण) जावे लागेल. नागरिकांनी त्यांच्या अपॉइंटमेंटच्या तारीख आणि वेळेत कोणताही बदल करू नये, फक्त नवीन पत्ता लक्षात घेऊन वेळेत हजर राहावे, असे आवाहन पासपोर्ट कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
स्थलांतरावरून संमिश्र प्रतिक्रिया
बावधन आणि कोथरूडमधील रहिवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, कारण त्यांना आता संपूर्ण शहर ओलांडून मुंढव्याला जाण्याची गरज उरणार नाही. मात्र, दुसरीकडे हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी याला विरोध केला आहे. खराडी, हडपसर आणि वाघोली भागातील नागरिकांसाठी पाषाण हे ठिकाण खूप लांब आणि खर्चिक पडेल, असे त्यांचे म्हणणे आहे. मुंढवा केंद्र सुरू ठेवून त्याची क्षमता वाढवणे अधिक सोयीचे ठरले असते, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
