विद्यार्थ्यांसाठी खास 'या' सुविधा:
सर्वात मोठा दिलासा म्हणजे, विद्यार्थ्यांकडे असलेले शाळा-महाविद्यालयाचे बस पास त्यांच्या निवासस्थानापासून ते परीक्षा केंद्रापर्यंतच्या प्रवासासाठी वैध राहतील. यासाठी त्यांना वेगळे तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. यासोबतच बसमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता, परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढच्या दरवाजातून प्रवेश मिळण्याची विशेष मुभा देण्यात आली आहे. यामुळे चढण्या-उतरताना होणारी ओढाताण टळेल. महत्त्वाच्या परीक्षा केंद्रांकडे जाणाऱ्या मार्गांवर बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे. गर्दीच्या वेळी विशेष बसेस सोडण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. प्रमुख बसथांब्यांवर विशेष अधिकारी आणि पर्यवेक्षक तैनात असतील. हे अधिकारी विद्यार्थ्यांना प्राधान्याने बसमध्ये प्रवेश मिळवून देण्यास मदत करतील.
advertisement
Weather Alret : महाराष्ट्रात आता होणार हवापालट, येणार नवीन लाट; हवामान खात्याकडून अलर्ट
शाळांच्या मागणीनुसार जादा बसेस
ज्या भागातून विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, अशा शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी मागणी केल्यास त्या मार्गावर अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी 'पीएमपी'ने दर्शवली आहे. ही सुविधा केवळ बारावीच्याच नाही, तर २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या (एसएससी) विद्यार्थ्यांसाठीही लागू राहणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना वाहतुकीच्या कोंडीतून आणि प्रवासाच्या चिंतेतून मोठा दिलासा मिळाला आहे.
