TRENDING:

'दो भाई, दोनो तबाही', गुन्हेगारीचे रील बनवणाऱ्या दोघांचा पुणे पोलिसांनी उतरवला माज, थेट मुंडन करून...

Last Updated:

पुण्याच्या खडकी पोलिसांनी गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रिल्स बनवणाऱ्या दोघांचा माज उतरवला आहे. त्यांचं मुंडन करून प्रक्षोभक रिल्स बनवल्याप्रकरणी माफी मागायला भाग पाडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: मागील काही काळात पुण्यासह आसपासच्या परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चाललं आहे. अनेक ठिकाणी कोयता हल्ला, खून आणि हाणामारीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी टोळीयुद्धातून आंदेकर टोळीने पुण्यात आयुष कोमकर आणि गणेश काळेची हत्या केली. यानंतर पुणे शहरासह जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

advertisement

सोशल मीडियावर चिथावणीखोर आणि गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रील बनवणाऱ्या तरुणांवर पोलिसांची करडी नजर आहे. दरम्यान, पुण्याच्या खडकी पोलिसांनी गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रिल्स बनवणाऱ्या दोघांचा माज उतरवला आहे. त्यांचं मुंडन करून प्रक्षोभक रिल्स बनवल्याप्रकरणी माफी मागायला भाग पाडलं आहे. यानंतर त्यांनी दोन्ही घटनांचा एकत्रित व्हिडीओ बनवून व्हायरल केला आहे.

पुण्यातील खडकी भागात दोन तरुणांनी येरवडा जेल, दो भाई... दोनो तबाही.... जिंदगी खराब करून टाकेल... अशा प्रकारचे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी प्रवृत्त करणारे वाक्य असल्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

advertisement

या व्हिडिओबद्दल खडकी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही तरुणांचा शोध घेण्याचं ठरवलं. गुप्त खबऱ्यांचा वापर करून त्यांनी दोघांना शोधून काढलं. तसेच पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेत त्यांचं मुंडन करून त्यांना थेट कॅमेऱ्यासमोर माफी मागायला लावली. पुणे पोलिसांकडून सध्या अशा पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: कांद्यानं रडवलं, रविवारी मका अन् सोयाबीनला किती मिळाला भाव?
सर्व पहा

मराठी बातम्या/पुणे/
'दो भाई, दोनो तबाही', गुन्हेगारीचे रील बनवणाऱ्या दोघांचा पुणे पोलिसांनी उतरवला माज, थेट मुंडन करून...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल