TRENDING:

Pune Rain: दोन तासांच्या पावसाने शहर का तुंबतं? पुणेकर संतापले

Last Updated:

मुसळधार पावसाने पुणे शहर अक्षरशः ठप्प झालं होतं. फक्त दोन तासांच्या पावसाने अनेक वर्षांचे विक्रम मोडले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  पुणे शहर पुन्हा एकदा गुरुवारी झालेल्या पावसात तुंबलं. दोन तासांच्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर ठप्प झाले होते. रस्त्यांवर गुडघाभर पाणी… घरात पाणी… आणि आता नागरिक थेट ओढ्यात उतरून आंदोलन करतायत… प्रश्न एकच पुणे का तुंबतंय?
News18
News18
advertisement

पुण्यातील कोथरूडमध्ये नागरिकांचा संताप आता उफाळून आलाय. ओढे-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलून बांधकाम केलं जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. डीपी रस्त्यासाठी नाले बुजवले जात आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे पावसाचं पाणी थेट रस्त्यावर. याच्या निषेधार्थ कोथरूडकर थेट ओढ्यात उतरले… “आमचा जीव घेतल्यावरच प्रशासन जागं होणार का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

advertisement

संसार उघड्यावर

गुरूवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुणे शहर अक्षरशः ठप्प झालं होतं. फक्त दोन तासांच्या पावसाने अनेक वर्षांचे विक्रम मोडले. शहरातील मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं. वाहनांचं मोठं नुकसान झालं आणि अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झाल पुण्यातील जनता वसाहतीत परिस्थिती आणखी गंभीर आहे. अनेक घरांच्या भिंती पावसामुळे कोसळल्या. काहींच्या घरात पाणी शिरलं. तर काहींचा संसार अक्षरशः उघड्यावर आला. नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासनाची कोणतीही मदत पोहोचलेली नाही

advertisement

दोन तासांच्या पावसाने शहर का तुंबतं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

या सगळ्या परिस्थितीवर बोलताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी बैठकघेऊन अधिकाऱ्यांना तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या. ड्रेनेजची सफाई, नाले मोकळे करणं आणि झाडांच्या फांद्या छाटण्याचे आदेश देण्यात आलेत. आयुक्त नवल किशोर राम यांनी देखील काही ठिकाणी दुर्लक्ष झाल्याची कबुली दिलीय. दोन तासांच्या पावसाने शहर का तुंबतं? नाले-ओढे बुजवणं, अनियंत्रित बांधकाम, आणि अपुरी ड्रेनेज व्यवस्था यामुळे दरवर्षी हा त्रास सहन करायचा का? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेत. मात्र या प्रश्नांची थेट उत्तरं काही मिळताना दिसत नाही.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Rain: दोन तासांच्या पावसाने शहर का तुंबतं? पुणेकर संतापले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल