पुण्यातील रविवार पेठ ही सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. येथील एका सराफा व्यावसायिकाकडे शिवलाल लोहार (वय ३४) हा कारागीर म्हणून कामाला होता. तक्रारदार व्यावसायिक चांदीचे विविध देवदेवतांचे मुखवटे घडवण्याचे काम करतात. त्यांनी विश्वासाने हे काम आपल्या कारागिराकडे दिलं होतं. मात्र, शिवलालने मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधली आणि चांदीचे दोन मौल्यवान मुखवटे चोरले. चोरीचा हा प्रकार लक्षात येताच व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली.
advertisement
झोपडीत मृतावस्थेत आढळली मुलगी; मांडी गायब, गळ्यावरील 'त्या' खुणा पाहून सगळेच हादरले
मिळालेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी शिवलाल लोहार याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून, तो आपल्या गावी (राजस्थान) पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस हवालदार हर्षल दुडम या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
