हवामान विभागाने दुपारी 2 ते 4 या वेळेत नोंदविलेल्या आकडेवारीनुसार शिवाजीनगर येथे केवळ दोन तासांत तब्बल 65 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली; तर एनडीए परिसरात 84 मिमी पाऊस पडला. अनेक रस्त्यांवर तर नद्यासारखं स्वरुप आलं होतं. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पुण्यात दुपारी आलेल्या पावसामुळं रस्त्यांवरुन पाणी वाहताना दिसून येत आहे. पुण्यात पावासमुळं भरदिवसा अंधाराची स्थिती निर्माण झाली होती. यामुळं काही वाहनचालकांनी वाहनांच्या हेडलाईट सुरु केल्याचं पाहायला मिळालं आहे.पुण्यात जवळपास एक तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडला. पुण्यात मुसळधार पाऊस सुरु असून ग्रामीण भागात गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
advertisement
दोन दिवस तापमानात थोडी वाढ होणार
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे उपलब्ध असलेल्या 1896 पासूनच्या आकडेवारीनुसार गुरूवारी झालेला हा पाऊस पुण्यातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक विक्रमी पाऊस ठरला आहे. यापूर्वी 4 एप्रिल 1896 मध्ये तब्बल 51.1 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. तर शहरात पुढील दोन दिवस तापमानात थोडी वाढ होणार असून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील मात्र दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका
पुणे जिल्ह्यात 12 तालुक्यात 105 गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. पावसामुळे तब्बल 1785 हेक्टर क्षेत्राच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे दोन दिवसात दोन जणांचा बळी गेला आहे. पुणे शहरात सिंहगड रस्त्यावर रंजना गिरी यांच्या अंगावर झाड कोसळून मृत्यू तर खेड तालुक्यात पोल्ट्री बांधकाम सुरू असताना वादळामुळे बांधकामातील भिंत कोसळून अलका मुसळे यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे.
हे ही वाचा :
