पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या परिसरात स्वराज्याची निर्मिती केली. सह्याद्रीच्या कडेकपारीत असणारे किल्ले हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे जीवंत साक्षीदार मानले जातात. याच गडकोटांचे संवर्धन करण्याचं काम अनेक दुर्गप्रेमी संस्था करत आहेत. पुण्यातील सह्याद्री प्रतिष्ठान ही यापैकीच एक आहे. आता याच संस्थेच्या 100 हून अधिक दुर्गरक्षकांनी एकत्र येत भीमाशंकर जवळील भोरगिरी किल्ल्यावर शिवरायांचं अनोखं स्मारक उभारलंय.
advertisement
12 वर्षांपासून दुर्गसंवर्धनाचं काम
पुण्यातील सह्याद्री प्रतिष्ठाण हे गेली 12 वर्षांपासून दुर्गसंवर्धनाच काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संस्थेनं दुर्ग संवर्धनाचं काम सुरू केलं. आतापर्यंत 900 हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर राबविल्या आहेत. तसेच हे काम पुढेही सुरूच राहणार असल्याचं दुर्गसेवक स्वप्निल काळभोर यांनी दिली.
वीरांच्या जिल्ह्यात शहिदांचं स्मारक, स्मृती उद्यानात 278 हुतात्म्यांना अनोखी मानवंदना, Video
भोरगिरी किल्ल्यावर अनोखं स्मारक
छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ही खऱ्या अर्थानं स्वराज्याचं प्रतिक होती. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने भीमाशंकर जवळील भोरगिरी किल्ल्यावर अनोखं स्मारक उभारण्यात आलंय. 100 हून अधिक दुर्गसेवकांनी एकत्र येत किल्ल्यावर एक भव्य राजमुद्रा नेली. 9 फूट बाय 8 फुटाच्या या भव्य राजमुद्रेचं स्मारक किल्ल्यावर उभारण्यात आलंय. किमान 40 वर्षे टिकेल अशा पद्धतीनं याची उभारणी करण्यात आल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक काळभोर यांनी सांगितले.
हुरडा पार्टी, पंगत जत्रा अन् उन्हाळी शिबिरे, पुण्याजवळ घ्या कृषी पर्यटनाचा आनंद, Video
111 किल्ल्यावर उभारणार राजमुद्रा
भोरगिरी प्रमाणेच राज्यातील 111 किल्ल्यांवर राजमुद्रा स्थापन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे वैभव दिलं त्याचं जतन करून तो वारसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न असल्याचेही दुर्गसेवकांनी सांगितले.