advertisement

मुंबई-पुणे महामार्गावर विचित्र अपघात, सुस्साट सुटलेल्या ट्रकची तीन वाहनांना जोरदार धडक

Last Updated:

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर रविवारी दुपारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास कार्ला फाटा येथे विचित्र अपघात घडला.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात
गणेश दुडम, प्रतिनिधी, मावळ (पुणे) : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यात वाकसाई ते कार्ला फाटा दरम्यान चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोर असलेल्या दोन ट्रक आणि एका पिकअप वाहनाला मागून जोरदार धडक दिली.
अपघात विचित्र आणि मोठा असला तरी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे काही काळ जुना पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी, पोलिसांनी तातडीने वाहने बाजूला काढली

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, ट्रक चालक अतिवेगाने वाहन चालवित असल्याने वारंवार होणाऱ्या अपघातांचे प्रमुख कारण वेग हेच असल्याचे घटनेतून दिसून येत आहे.
advertisement

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी, 'मिसिंग लिंक' मे महिन्यात प्रवाशांच्या सेवेत

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात झाल्यानंतर जवळपास 32 तास मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यायी मार्गांच्या अभावावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘मिसिंग लिंक’ हा मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील सर्वात धोकादायक घाट मार्गाला पर्याय देण्यासाठी प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Expressway) 'मिसिंग लिंक' प्रकल्प हा ६,६९५ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, खंडाळा घाटातील धोकादायक वळणे वगळून प्रवासाचा वेळ २५-३० मिनिटांनी कमी करणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबई-पुणे महामार्गावर विचित्र अपघात, सुस्साट सुटलेल्या ट्रकची तीन वाहनांना जोरदार धडक
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement