NEP vs ENG : शेवटच्या बॉलपर्यंत नेपाळने झुंजवलं, इंग्लंडने रडत रडत विजय मिळवला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
इंग्लंडने दिलेल्या 184 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळल 180 धावांपर्यंत मजल मारता आली.त्यामुळे नेपाळचा 5 धावांनी पराभव झाला होता. विशेष म्हणजे या सामन्यात नेपाळच्या लोकेशने शेवटच्या क्षणी केलेल्या 39 धावांची खेळी करून सामना फिरवण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला.
Nepal vs England T20 World Cup 2026 : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमधील मुंबईच्या वानखेडेवरील मैदानात पार पडलेल्या सामन्यात नेपाळने बलाढ्य इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या बॉलपर्यंत झुंजवत ठेवलं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये नेपाळला 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता होती पण त्यांना 5 धावा काढता आल्याने इंग्लंडने 4 धावांनी सामना जिंकला होता. इंग्लंडने दिलेल्या 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळला 180 धावांपर्यंत मजल मारता आली होती. विशेष म्हणजे या सामन्यात नेपाळच्या लोकेशने शेवटच्या क्षणी 18 बॉलमध्ये 39 धावांची खेळी करून सामना फिरवण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला होता.
खरं तर इंग्लंडने नेपाल समोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपालचे कुशल भूरटेल आणि आसिफ शेखची सूरुवात खराब झाली होती. पण नेपालच्या फलंदाजांनी दुसऱ्याच ओव्हरमध्ये गिअर बदलत आक्रामक फलंदाजी केली. इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कुशल भूरटेलने तीन खणखणीत चौकार लगावले होते.त्यानंतर मार्क वुडला नेपाली बॅटसमनने धुतला होता. त्यामुळे दोन ओव्हरमध्ये नेपालने 29 धावा काढल्या होत्या. त्यानंतर आसिफ शेख 7 धावांवर बाद झाला होता. त्याच्या पाठोपाठ कुशल भुरटेलही 29 धावांवर आऊट झाला.
advertisement
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित पोडेल आणि दिपेंद्र सिंह ऐरी फलंदाजी आले होते. या दोघांनी सूरूवातीला थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर गिअर बदलला होता. दोघांनी गिअर बदलल्यानंतर नेपाल 8 विकेट राखून अस जिंकेल असे वाटत होते. कारण या दोन्ही खेळाडूंनी नेपालचा डाव 100 च्या पाल नेला होता.त्यामुळे नेपाल संघाला जिंकण्याची आशा निर्माण झाली होती. पण तेवढ्यात दिपेंद्र सिंह 44 वर बाद झाला, त्याच्या पाठोपाठ रोहित पौडेल देखील 39 वर बाद झाला.त्यामुळे दोन्ही खेळाडू बाद झाल्याने नेपाल संकटाच सापडली होती. त्यानंतर आरिफ शेख मैदानात आला पण तो देखील 10 धावा देऊन बाद झाला.
advertisement
त्याच्यानंतर लोकेश बामने शेवटच्या क्षणी 18 बॉलमध्ये 39 धावांची खेळी करून सामना फिरवण्याचा प्रयत्न केला होता.शेवटच्या ओव्हरला 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता होती. पण लोकेश बामला फक्त 5 धावा काढता आल्याने नेपाळने हा सामना 4 धावांनी गमावला होता.
दरम्यान इंग्लंडच्या फलंदाजी बद्दल बोलायचं झालं तर जेकोब बेथेलने 55 आणि कर्णधार हॅरी ब्रुकने 53 धावांची अर्धशतकीय केली होती. आणि शेवटी विल जॅक्सने 18 बॉल 39 धावांची ताबडतोड खेळी करून इंग्लंडचा डाव 184 पर्यंत खेचून आणला होता.नेपालकडून दिपेंद्र सिंह आणि नंदन यादवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या.शेर मल्ला आणि संदीप लामिछाने 1 विकेट घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 6:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
NEP vs ENG : शेवटच्या बॉलपर्यंत नेपाळने झुंजवलं, इंग्लंडने रडत रडत विजय मिळवला










