मैदानात आला अन् धापकन पडला, पण पुढे जे झालं... 60 वर्षांच्या आमिर खानने सर्वांनाच शॉक केलं, VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Aamir Khan: WPBL 2026 दरम्यान, आमिर खान स्वतः हातात रॅकेट घेऊन मैदानात उतरला. पण खेळता खेळता अचानक असं काही घडलं की मैदानावरील प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला.
मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खान कधी काय करेल याचा नेम नसतो. कधी तो अरिजित सिंगसोबत गच्चीवर पतंग उडवताना दिसतो, तर कधी अचानक एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये खेळाडू बनून सर्वांना चकित करतो. शनिवारी मुंबईच्या जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये असंच काहीसं पाहायला मिळालं. निमित्त होतं 'वर्ल्ड पिकलबॉल लीग' (WPBL 2026) चं. या सोहळ्याला आमिरने हजेरी लावली आणि केवळ हजेरीच लावली नाही, तर चक्क हातात रॅकेट घेऊन तो मैदानातही उतरला. पण खेळता खेळता अचानक असं काही घडलं की मैदानावरील प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.
WPBL च्या दुसऱ्या सीझनचे सेमीफायनल सामने रंगले होते. सेलिब्रिटी म्हणून आलेल्या आमिरने उत्साहाच्या भरात चाहत्यांसोबत दोन सामने खेळायचा निर्णय घेतला. ब्लॅक टी-शर्ट आणि निळ्या पॅंटमध्ये आमिर कमालीचा फिट दिसत होता. खेळ रंगात आला असतानाच, समोरून आलेला एक शॉट परतवण्यासाठी आमिर वेगाने पुढे सरसावला. पण दुर्दैवाने त्याचा पाय घसरला आणि तो कोर्टवर धपकन पडला. ६० वर्षांचा सुपरस्टार असा अचानक पडलेला पाहून तिथे उपस्थित असलेले आयोजक आणि चाहते काही क्षणासाठी घाबरले.
advertisement
मैदानात पडल्यानंतर आमिरने केलं असं काही...
पण मैदानात पडल्यानंतर, आमिर एखाद्या विशीतल्या तरुणासारखा क्षणार्धात उसळी मारून उठला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही वेदना नव्हती, तर उलट एक मोठी स्माईल होती. त्याने सावरत पुन्हा रॅकेट पकडलं आणि खेळ सुरू केला. पडल्यानंतर ज्या वेगाने तो सावरला, ते पाहून प्रेक्षक थक्क झाले.
advertisement
advertisement
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस पडला आहे. कुणी म्हणतंय, "सर, या वयात इतकी एनर्जी आणता कुठून?" तर कुणी थेट त्याच्या डाएटबद्दल विचारलंय. एका चाहत्याने लिहिलंय, "आमिर सर, तुमच्या फिटनेसचं गुपित काय? आम्हालाही सांगा!" वयाची साठी गाठूनही आमिरची ही चपळाई आजच्या पिढीला लाजवणारी आहे.
आमिरचा 'हॅप्पी पटेल' बॉक्स ऑफिसवर आपटला
advertisement
एकिकडे आमिरचा फिटनेस चर्चेत असला, तरी दुसरीकडे त्याच्या प्रॉडक्शन हाऊससाठी काळ थोडा कठीण आहे. नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा 'हॅप्पी पटेल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. १६ जानेवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत केवळ ७.३५ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये आमिरचा कॅमिओ असूनही प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. याआधी तो रजनीकांतच्या 'कुली' मध्ये दिसला होता, तर 'सितारे जमीन पर' ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 6:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मैदानात आला अन् धापकन पडला, पण पुढे जे झालं... 60 वर्षांच्या आमिर खानने सर्वांनाच शॉक केलं, VIDEO VIRAL










