TRENDING:

धक्कादायक! आई-वडिलांचं 'ते' वागणं मनाला लागलं; पुण्यात रोहितनं आयुष्यच संपवलं

Last Updated:

व्यसनावरून आई-वडिलांनी ओरडल्याने आणि मारहाण केल्याने रागाच्या भरात एका १९ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमेश्वरनगर परिसरात घडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाला सुधारण्यासाठी पालकांनी दिलेली समज अखेर जीवावर बेतली आहे. व्यसनावरून आई-वडिलांनी ओरडल्याने आणि मारहाण केल्याने रागाच्या भरात एका १९ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमेश्वरनगर परिसरात घडली. रोहित गोरख राठोड असे या तरुणाचे नाव आहे.
तरुणाचं टोकाचं पाऊल (AI Image)
तरुणाचं टोकाचं पाऊल (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

रोहितचे कुटुंब मूळचे ऊसतोडणी कामगार असून, ते सध्या सोमेश्वर कारखान्याच्या कामगार वसाहतीत वास्तव्यास आहेत. रोहितला गेल्या काही काळापासून दारूचे वाईट व्यसन लागले होते. आपल्या तरुण मुलाने व्यसन सोडावे आणि कष्ट करून आयुष्यात उभे राहावे, अशी पालकांची इच्छा होती. याच कारणावरून घरात वारंवार खटके उडत असत.

Pune News: मोठा निर्णय! पुणेकरांनो, जुनी गाडी वापरताय? शहरात 7 लाख जुन्या वाहनांना बसणार 'ब्रेक'; बंदीची टांगती तलवार

advertisement

घटनेच्या दिवशी रोहित पुन्हा व्यसनाच्या नशेत घरी आला होता. हे पाहून हताश झालेल्या पालकांनी त्याला कठोर शब्दांत समज दिली आणि राग अनावर झाल्याने त्याला मारहाण केली. पालकांचा हा ओरडा मनाला लावून घेत रोहितने रागाच्या भरात वसाहतीजवळील पाण्याच्या खाणीचा परिसर गाठला. तिथे असलेल्या लोखंडी अँगलला त्याने गळफास लावून आपले जीवन संपवले.

advertisement

कामगार वसाहतीत हळहळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमचा जीव मोलाचा! पुण्यातली संस्था करतेय कौतुकास्पद काम, Video पाहून कराल सलाम
सर्व पहा

ऐन उमेदीच्या काळात मुलाने असे पाऊल उचलल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाला सुधारण्याच्या नादात त्याच्याकडून ही टोकाची कृती घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! आई-वडिलांचं 'ते' वागणं मनाला लागलं; पुण्यात रोहितनं आयुष्यच संपवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल