TRENDING:

Pune News: पुण्यात स्पा सेंटरमध्ये पोलिसांसमोरच तरुणीचा 'मृत्यू', नेमकं काय घडलं? CID करणार तपास

Last Updated:

पोलिसांचे पथक दारात पाहताच घाबरलेल्या एका तरुणीने आणि तिथल्या व्यवस्थापकाने (मॅनेजर) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या भीषण अपघातात तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : विमाननगर येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान इमारतीवरून उडी मारल्यामुळे झालेल्या तरुणीच्या मृत्यूचं प्रकरण आता गंभीर वळणावर आलं आहे. या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला असून या घटनेतील कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
इमारतीवरून उडी मारल्यामुळे तरुणीचा मृत्यू
इमारतीवरून उडी मारल्यामुळे तरुणीचा मृत्यू
advertisement

नेमकी घटना काय?

विमाननगर परिसरातील एका इमारतीत स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिथे छापा टाकला. पोलिसांचे पथक दारात पाहताच घाबरलेल्या एका तरुणीने आणि तिथल्या व्यवस्थापकाने (मॅनेजर) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या भीषण अपघातात तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर व्यवस्थापकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

advertisement

नातेवाईकांचा आक्रोश आणि आयुक्तांची भेट

या घटनेनंतर मृत तरुणीच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. नातेवाईकांच्या मागणीची दखल घेत आयुक्तांनी हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले.

सीआयडीकडून तपासाला सुरुवात

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी, पण चालवतात ‘5 स्टार रिक्षा’, Video पाहाल तर आवाक् व्हाल
सर्व पहा

प्रकरण हाती घेताच सीआयडीच्या पथकाने विमाननगरमधील त्या इमारतीला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांचा छापा पडल्यानंतर नक्की काय घडले, याची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू झाले आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्यात स्पा सेंटरमध्ये पोलिसांसमोरच तरुणीचा 'मृत्यू', नेमकं काय घडलं? CID करणार तपास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल