मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी, पण चालवतात ‘5 स्टार रिक्षा’, Video पाहाल तर आवाक् व्हाल
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: नाविन्यपूर्ण संकल्पना आणि प्रवाशांच्या सोयीचा विचार करून तयार करण्यात आलेली ही रिक्षा सध्या परिसरात आकर्षणाचा विषय ठरत आहे.
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील एक अनोखी रिक्षा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रवाशांना फाईव्ह स्टार रूमप्रमाणे सुविधा देणारी ही रिक्षा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या रिक्षाचे मालक कल्याण कसबे हे एका मल्टिनॅशनल कंपनीत सर्व्हिस मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ऑफिसची जबाबदारी सांभाळत ते आवडीपोटी रिक्षा चालवतात. काहीतरी वेगळं आणि प्रवाशांना आरामदायी अनुभव देण्याच्या हेतूने त्यांनी ही संकल्पना राबवली आहे. त्यांच्या या अनोख्या रिक्षाविषयी लोकल 18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
कल्याण कसबे हे एका मल्टिनॅशनल कंपनीत सर्विस मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. आपल्या आवडीमधून आणि नावीन्यपूर्ण कल्पनेतून त्यांनी ही रिक्षा साकारली. विशेष म्हणजे या रिक्षाच्या निर्मितीसाठी टाकाऊ वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर पुनर्वापर करण्यात आला आहे. एसी, वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वच्छ व आकर्षक इंटेरिअर अशा विविध सोयींमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होत आहे. या रिक्षेसाठी साधारण 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च आल्याचे कसबे यांनी सांगितले.
advertisement
फाईव्ह स्टार सारख्या रिक्षामध्ये सुविधा
प्रवाशांना केवळ एका सीटपुरती मर्यादित सेवा न देता अधिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न या अनोख्या रिक्षेत करण्यात आला आहे. रिक्षामध्ये मोफत पिण्याचे पाणी, कचराकुंडी, प्रथमोपचार पेटी, संगीत प्रणाली, पडदे, नाश्त्यासाठी ट्रे आणि रंगीत टीव्हीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
advertisement
सुरक्षेला प्राधान्य देत रिक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, तसेच प्रवाशांसाठी वाय-फायची सोय करण्यात आली आहे. चालकाच्या सुरक्षेसाठी सीट बेल्टची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे, व्हीलचेअर प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून ही रिक्षा विशेष गरजा असलेल्या प्रवाशांसाठीही सर्वसमावेशक ठरत आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना आणि प्रवाशांच्या सोयीचा विचार करून तयार करण्यात आलेली ही रिक्षा सध्या परिसरात आकर्षणाचा विषय ठरत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 9:41 AM IST








