TRENDING:

उन्हाळ्याआधीच पुणेकरांच्या घशाला कोरड! पाणी जपून वापरा, शहरातील या महत्त्वाच्या भागात पाणीपुरवठा कपातीचा निर्णय

Last Updated:

पुण्यातील वानवडी परिसरात आधीच पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असताना, आता प्रशासनाने पाणीपुरवठ्यात १ एमएलडीची (MLD) कपात केल्याने नागरिकांच्या अडचणींत मोठी भर पडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील वानवडी परिसरात आधीच पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असताना, आता प्रशासनाने पाणीपुरवठ्यात १ एमएलडीची (MLD) कपात केल्याने नागरिकांच्या अडचणींत मोठी भर पडली आहे. या कपातीमुळे वानवडी गाव आणि आसपासच्या सोसायट्यांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, संतप्त रहिवाशांनी महापालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे.
पुण्यात पाणीपुरवठा कपात
पुण्यात पाणीपुरवठा कपात
advertisement

१० वरून ९ एमएलडीवर पुरवठा

सुमारे आठ महिन्यांपूर्वी वानवडी परिसराला दररोज १० एमएलडी पाणी मिळत होते. लोकसंख्या वाढत असताना पाणीपुरवठा वाढवणे गरजेचे होते, मात्र प्रशासनाने तो चक्क ९ एमएलडीपर्यंत कमी केला आहे. आधीच अपुरा वाटणारा पुरवठा आता आणखी कमी झाल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल जांभूळकर यांनी यासंदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त आणि लष्कर पाणीपुरवठा विभागाला लेखी पत्र देऊन ही कपात अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

advertisement

या भागांना बसतोय सर्वाधिक फटका

पाणी कपातीचा थेट परिणाम वानवडी गाव, होले मळा, जांभूळकर मळा, तात्या टोपे सोसायटी परिसर आणि एसव्हीनगर या भागांवर झाला आहे. या ठिकाणी पाणी इतक्या कमी दाबाने येत आहे की, नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः गृहिणींचे वेळेचे नियोजन कोलमडले असून, परिसरात टंचाईची तीव्रता अधिकच वाढली आहे.

advertisement

प्रशासनाचे म्हणणे काय?

लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. "वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्यात काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे. सध्या पाणीपुरवठा सुरू असून, ज्या ठिकाणांहून कमी दाबाच्या तक्रारी येत आहेत, त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे," असे त्यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमचा जीव मोलाचा! पुण्यातली संस्था करतेय कौतुकास्पद काम, Video पाहून कराल सलाम
सर्व पहा

असे असले तरी, 'कमी दाबाच्या तक्रारींचे निरसन' हा केवळ कागदोपत्री दावा असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच वानवडीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने येणारे दिवस अधिक कठीण जाण्याची चिन्हे आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
उन्हाळ्याआधीच पुणेकरांच्या घशाला कोरड! पाणी जपून वापरा, शहरातील या महत्त्वाच्या भागात पाणीपुरवठा कपातीचा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल