तापमानातील चढ-उतार
पावसाने विश्रांती घेताच पाऱ्यात २ अंशांनी वाढ होऊन तो ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. रात्रीच्या गारव्यातही किंचित बदल झाला असून किमान तापमान १७.७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.
पुढील ४८ तासांचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (४ एप्रिल) आणि रविवारी पुण्याचे हवामान स्थिर राहील. सकाळी आकाश मुख्यतः निरभ्र राहील. दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात, ज्यामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळू शकतो.
advertisement
पुढील दोन दिवस कमाल आणि किमान तापमान स्थिर राहणार असल्याने पुणेकरांना संमिश्र हवामानाचा अनुभव येईल.
या भागात यलो अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्राला अवकाळी संकटाने हैराण केल्याचं चित्र आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या ताज्या अंदाजानुसार, 4 एप्रिलला महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30-50 किमी वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे. काही भागांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.
