नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अकरा वर्षीय मुलगी 4 फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास आपल्या घरासमोर खेळत होती. यावेळी प्रशांत काळे (वय 30, रा. राजमाता कॉलनी, कात्रज-कोंढवा रस्ता) हा आरोपी तिथे आला. त्याने खेळत असलेल्या चिमुरडीजवळ जाऊन तिच्याशी अश्लील संवाद साधला आणि लगट करण्याचा प्रयत्न केला.
चिमुरडीच्या धैर्यामुळे फुटलं भांडं
advertisement
आरोपीच्या या वागण्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली. तिने तात्काळ घरात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. आपल्या मुलीसोबत घडलेला हा गंभीर प्रकार समजताच पालकांनी वेळ न घालवता येवलेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.
पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून येवलेवाडी पोलिसांनी प्रशांत काळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो - POCSO) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाडिक करत आहेत.
वृद्धेवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा
नात्यातील विश्वासाला तडा देत आजारी ज्येष्ठ महिलेवर अत्याचार करणाऱ्या ५८ वर्षीय नराधमाला पुणे न्यायालयाने कठोर धडा शिकवला आहे. ७५ वर्षीय पीडित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी सुनावली आहे. ही घटना सप्टेंबर २०१९ मध्ये घडली होती. पीडित ७५ वर्षीय महिला आजारी होती. याचाच फायदा घेत आरोपीने त्यांना दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने नेले. मात्र, परत येत असताना त्याने माणुसकीची सर्व सीमा ओलांडली. आरोपीने पीडितेला एका अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी नेले. तिथे त्यांना जमिनीवर पाडून, तोंडात रुमाल कोंबला जेणेकरून त्या ओरडू शकणार नाहीत आणि त्यांच्यावर बळजबरीने बलात्कार केला.
