TRENDING:

Pune ZP Election Result: पुण्याच्या गावगाड्याचं मत घड्याळाला,अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मिनिटातच मुसंडी; कुठे मारली बाजी

Last Updated:

तिरंगी आणि चौरंगी लढतींमुळे अनेक ठिकाणी फरक अत्यल्प असून निकाल शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला  सुरुवात  झावी आहे. पहिल्याच फेरीत काही गट व गणांमध्ये आघाडी-पिछाडीचे अनपेक्षित चित्र समोर येत आहे. थेट, तिरंगी आणि चौरंगी लढतींमुळे अनेक ठिकाणी फरक अत्यल्प असून निकाल शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मतमोजणी केंद्र परिसरात समर्थकांची गर्दी वाढली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे. पुण्याच्या जिल्हा परिषदांच्या  बातम्यांचे अपडेट Live लिंकवर मिळतील.  पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारली असून पोस्टलमध्ये आघाडी मारली आहे.
News18
News18
advertisement

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती टपाली मतमोजणीत अजित पवार राष्ट्रवादीची आघाडी घेतली आहे.  मावळ तालुक्यात टपाली मतमोजणी सुरु आहे.

मतमोजणी: टप्प्याटप्प्याने सुरू

73 जिल्हा परिषद गट | 146 पंचायत समिती गण

प्रमुख लढत: राष्ट्रवादी × भाजप × शिवसेना × काँग्रेस

आघाडी–पिछाडीचे चित्र

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रत्येक फेरीसोबत समीकरणे बदलताना दिसत आहेत. काही ठिकाणी अंतर्गत बंडखोरी, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार निकालावर निर्णायक ठरत असल्याचे चित्र आहे. मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांची गर्दी वाढली असून काही ठिकाणी विजयाच्या घोषणा ऐकू येत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

advertisement

पुणे जिल्हा परिषद निवडणूक – राजकीय चित्र

राष्ट्रवादी विरुद्ध भाजप: थेट संघर्ष

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात थेट लढत रंगली आहे. ७३ गटांपैकी ५९ गटांत दोन्ही पक्ष आमनेसामने आहेत. २०१७ मध्ये राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला होता; मात्र यंदा भाजपने आक्रमक रणनीती आखल्याने चित्र बदलण्याची शक्यता आहे.

advertisement

अजित पवारांच्या निधनाचा परिणाम

निवडणूक प्रचारादरम्यानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण प्रचाराचा नूर बदलला. जाहीर सभा टाळून मर्यादित प्रचार करण्यात आला, ज्याचा परिणाम काही गटांत दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तालुकानिहाय संघर्ष

हवेली, दौंड, शिरूर, इंदापूर: भाजप × राष्ट्रवादी

आंबेगाव, मावळ, मुळशी: दोन्ही राष्ट्रवादी गट

खेड, जुन्नर, भोर: दोन्ही शिवसेना

advertisement

२०१७ चा निकाल

  • राष्ट्रवादी काँग्रेस – 44
  • शिवसेना – 33
  • भाजप – 9
  • काँग्रेस – 9

तालुका (Taluka)
मतमोजणी केंद्र (Counting Center)
जुन्नर
श्री लेण्याद्री गणपती भक्त निवास भाग क्र. २, गोळेगाव
आंबेगाव
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, अवसरी खुर्द
शिरूर
महाराष्ट्र वखार महामंडळ गोदाम, रांजणगाव एमआयडीसी, कोरेगाव
खेड
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, तालुका क्रीडा संकुल, तिऱ्हेवाडी
मावळ
तहसील कार्यालय, वडगाव मावळ
मुळशी
राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिक शाळा, कासार आंबोली
हवेली
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आंबेगाव बुद्रूक, सेंट्रल लायब्ररी समोर, पुणे
दौंड
शासकीय धान्य गोदाम, नगरमोरी चौक
पुरंदर
नवीन प्रशासकीय इमारत सासवड
राजगड
शासकीय धान्य गोदाम
भोर
कान्होजी जेधे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोर
बारामती
जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, बारामती
इंदापूर
शासकीय धान्य गोदाम, कालठण रस्ता, इंदापूर

advertisement

राजकीय अर्थ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट
सर्व पहा

आजच्या निकालातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण सत्तासमीकरणांची पुढील दिशा स्पष्ट होणार असून, आगामी काळातील राजकीय गणितांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune ZP Election Result: पुण्याच्या गावगाड्याचं मत घड्याळाला,अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मिनिटातच मुसंडी; कुठे मारली बाजी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल