या निवडणुकीत 68.35 टक्के इतके विक्रमी मतदान झाल्याने ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत वाढत जाणारी आघाडी अखेर निर्णायक विजयात रूपांतरित झाली. विशेष म्हणजे अनेक मतदारसंघांत मोठ्या फरकाने विजय मिळाल्याने अजित पवार गटाची मावळमधील राजकीय पकड अधिकच मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
advertisement
हेही वाचा: महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकाल २०२६ चे लाईव्ह अपडेट्स
टाकवे बुद्रुक पंचायत समिती विजयी उमेदवार
प्राची गायकवाड – 11,681 (विजयी)
नाणे : आशा मोरमारे – 10,057 (विजयी)
वराळे : राजेंद्र कडलक – 9,656 (विजयी)
इंदुरी : दिलीप ढोरे – 7,073 (विजयी)
खडकाळे : समीर जाधव – 9,059 (विजयी)
कार्ला : रेश्मा देवकर – 7,234 (विजयी)
कुसगांव बुद्रुक : योगेश लोहर – 7,287 (विजयी)
काले : शैला कालेकर – 10,264 (विजयी)
सोमाटणे : साहेबराव कारके – 9,218 (विजयी)
चांदखेड : सुनिता येवले – 10,569 (विजयी)
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार
| टाकवे बु | अनंता पावसे |
| इंदूरी | पल्लवी दाभाडे |
| खरकाळे | दीपाली हुलावले |
| कुसगाव बु | संतोष राऊत |
| सोमटणे | मनीषा मुरे |
या घवघवीत यशामुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भाजपसाठी हा पराभव चिंताजनक मानला जात असून, संघटनात्मक फेरबदलांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
