TRENDING:

Shirur ZP Election Results: शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला,कोण मारणार बाजी याकडे लक्ष?

Last Updated:

शिरुर तालुक्यात मतदार पुन्हा प्रस्थापित नेतृत्वावर विश्वास दाखवणार की नवा इतिहास घडवणार, याबाबत तालुक्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे  : शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीकडे आज सर्वांचे लक्ष लागले असून, यंदाची निवडणूक राजकीयदृष्ट्या वेगळ्याच वळणावर उभी राहिली आहे. तीन माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्य थेट निवडणूक रिंगणात उतरल्याने ही लढत केवळ पक्षीय न राहता प्रतिष्ठेची ठरली आहे. मतदार पुन्हा प्रस्थापित नेतृत्वावर विश्वास दाखवणार की नवा इतिहास घडवणार, याबाबत तालुक्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
News18
News18
advertisement

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या शिरूरमध्ये यंदा भाजपने कडवे आव्हान उभे केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे.

गटवार लढती आणि चुरशीचे सामने

  • टाकळी हाजी जिल्हा परिषद गट: दामू अण्णा घोडे (राष्ट्रवादी), बाळासाहेब डांगे (शिवसेना उबाठा), सुभाष पोकळे (शिवसेना शिंदे) आणि राजेंद्र गावडे (भाजप) यांच्यात चौरंगी लढत.
  • advertisement

  • शिरूर ग्रामीण–न्हावरा गट: मालतीताई पाचर्णे (भाजप) विरुद्ध वृषाली वाळके (राष्ट्रवादी). दिवंगत बाबूराव पाचर्णे यांच्याविषयीची सहानुभूती कितपत प्रभाव टाकते, याकडे लक्ष.
  • मांडवगण फराटा गट: सुजाता पवार (राष्ट्रवादी), मच्छिद्र गदादे (शिवसेना ठाकरे), सचिन शेलार (भाजप) आणि दादासाहेब फराटे (स्वाभिमानी) यांच्यात चौरंगी लढत.
  • तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस गट: रेखा बांदल (राष्ट्रवादी), सारिका करपे (शिवसेना शिंदे), दीपाली गव्हाणे (भाजप) आणि रेश्मा शिंदे (अपक्ष).
  • advertisement

  • शिक्रापूर–सणसवाडी गट: मोनिका हरगुडे (राष्ट्रवादी) विरुद्ध सीमा कळमकर (अपक्ष); भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने चर्चा.
  • पाबळ–केंदूर गट: प्रफुल्ल शिवले (राष्ट्रवादी) विरुद्ध विकास गायकवाड (भाजप).

कवठे येमाई–टाकळी हाजी, रांजणगाव गणपती–कारेगाव आणि तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस गटांमध्ये तालुक्याच्या सरासरीपेक्षा अधिक मतदान नोंदवले गेले आहे.

शिरुरमध्ये किती टक्के मतदान?

शिरूर तालुक्यात यंदा  75.59 टक्के विक्रमी मतदान झाले आहे.

advertisement

  • एकूण मतदार: 2,28,119
  • पुरुष मतदार: 1,18,685
  • महिला मतदार: 1,09,422
  • टॉप व्हिडीओज

    सर्व पहा
    पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट
    सर्व पहा

मराठी बातम्या/पुणे/
Shirur ZP Election Results: शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला,कोण मारणार बाजी याकडे लक्ष?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल