TRENDING:

बिबट्या शेतातही फिरणार नाही, स्वस्तात मस्त अशी झटका मशीन, असं करते काम! VIDEO

Last Updated:

बिबट्यांपासून आणि इतर जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी सोलर झटका मशीन उपयुक ठरते असा दावा करण्यात आला आहे. सध्या या मशीनची शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रतिनिधी पूजा सत्यवान पाटील, पुणे
advertisement

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकार या घटनांना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिक काही ठिकाणी झटका मशीन वापरत आहेत. पुण्यातील किसान कृषी प्रदर्शनात ही झटका मशीन पाहायला मिळाली. प्रदर्शनात सोलर झटका मशीन मांडणाऱ्या स्वप्नाली यांनी ही मशीन कशी काम करते ? याविषयी लोकल 18 ला माहिती दिली आहे.

advertisement

स्वप्नाली यांनी सांगितले की, Jewel electronic ही कंपनी गेल्या 14 वर्षांपासून झटका मशीन तयार करत आहे. बिबट्या तसेच इतर जंगली प्राणी पिकांमध्ये घुसू नयेत किंवा मानवी वस्तीपासून दूर राहावेत, यासाठी ही मशीन उपयुक्त ठरते. शेती किंवा ज्या ठिकाणी संरक्षण आवश्यक आहे, त्या परिसरात तारेचे कुंपण उभारून त्याला ही झटका मशीन जोडली जाते. प्राणी कुंपणाला स्पर्श करताच त्यांना हलका करंटचा झटका बसतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रविवारी मार्केट हाललं, आल्याची आवक वाढली, डाळिंब अन् केळीला किती मिळाला भाव?
सर्व पहा

हा झटका केवळ प्रतिबंधासाठी असून तो प्राण्यांच्या जीवाला कोणताही धोका पोहोचवत नाही. ही मशीन शेतकऱ्यांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध आहे. 2,200 रुपये ही याची किंमत आहे. प्रत्येक भागानुसार किंमत थोडी कमी-जास्त असू शकते. संबंधित ठिकाणचे क्षेत्रफळ पाहून मशीनची किंमत ठरवली जाते. बिबट्यांपासून बचावासाठी ही मशीन अतिशय उपयुक्त असल्याचा दावाही स्वप्नाली यांनी केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
बिबट्या शेतातही फिरणार नाही, स्वस्तात मस्त अशी झटका मशीन, असं करते काम! VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल