मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पालिकेमध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पुण्यातील कोंढवा भागातील एका रहिवाशी आज शुक्रवारी महापालिकेच्या कर संकलन विभागामध्ये आला होता. त्यानंतर संतापलेल्या या रहिवाशाने स्वतःच्या डोक्याला पिस्तूल लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पालिकेतील सुरक्षारक्षकांनी धाव घेऊन त्याला रोखलं.
ही व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून कर विभागात खेट्या मारत होता. त्याचा कर भरून घेण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्याने केला. आज अभय योजनेचा अखेरचा दिवस होता मात्र गेल्या काही दिवसांपासून पालिकेत सतत चकरा मारत त्याने त्याचे बिल काढण्यास अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. मात्र अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. अखेरीस आज हताश झालेल्या या व्यक्तीने त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हर काढून स्वतःच्या डोक्याला लावत आत्महत्या करण्याची धमकी दिली. पण, वेळीच सुरक्षारक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला रोखलं.
advertisement
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पालिकेत पोलीस दाखल झाले. या व्यक्तीकडे रिव्हॉल्व्हर कुठून आली, त्याचा परवाना आहे का? याबाबत अधिक तपास केला जात आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
