TRENDING:

मंचर हादरलं! शटर ओढून सलूनमध्ये घुसले, मालकाला बेदम मारहाण; थरारक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Last Updated:

सलून व्यावसायिकाला झालेली मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेची सीसीटीव्ही समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन तोडकर, प्रतिनिधी
advertisement

पुणे : पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सलून व्यवसायिकाला मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. सलून व्यावसायिकाला झालेली मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेची सीसीटीव्ही समोर आला आहे. या घटनेत 25 वर्षीय सलून व्यावसायिक फिरोज फत्तेमहिंद शेख याला दुकानातच घुसून अमानुष मारहाण करण्यात आली आहे.

आरोपी मोहम्मद मीर याने त्याच्यासह त्याचे साथीदार मोहम्मद युसुफ अन्सारी व शकीबज अत्तार यांनी पैशांच्या कारणावरून वाद घालत फिरोज शेख याला शिवीगाळ करत काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिरोज शेख याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

advertisement

मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे कैद झाली असून, फुटेजमध्ये सलून व्यवसायिकाला निर्दयपणे मारहाण होत असल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस (Manchar Police)  करत आहेत.

advertisement

 कठोर कारवाई करण्याची मागणी

दरम्यान पुणे शहरानंतर आता पुणे ग्रामीण भागातही वाढत चाललेल्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली असून, अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

रावेतमध्ये कुत्र्याच्या स्थलांतरावरून वाद, कर्मचाऱ्याला बेदम मारहाण 

advertisement

रावेत परिसरातील एका वसाहतीजवळील कुत्रा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याने संतप्त झालेल्या एका प्राणीप्रेमीने वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. कुत्र्याचे स्थलांतर केल्याच्या कारणावरून वाद वाढत थेट मारहाणीपर्यंत मजल गेल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

धनिक बापाचा अल्पवयीन मुलगा मुंबईच्या रस्त्यावर सुसाट! Kia ने दुचाकीला चिरडलं, नवरा-बायको मृत्यूच्या दारात

मराठी बातम्या/पुणे/
मंचर हादरलं! शटर ओढून सलूनमध्ये घुसले, मालकाला बेदम मारहाण; थरारक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल