नेमका वाद काय?
फिर्यादी विकी मुरलीधर रजपूत (वय ३०, सध्या रा. ऊदाचीवाडी) यांची भोसे चाकण आणि वाकड परिसरात एक गुंठा जमीन आहे. या जागेवरून त्यांचे मावसभाऊ पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड आणि काका उत्तरसिंग रामकुमार राठोड यांच्याशी दीर्घकाळापासून वाद सुरू होता. विकी हे पूर्वी चाकण येथे वडापावचा व्यवसाय करायचे. मात्र, मावसभाऊ आणि काका यांच्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून ते गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या आईकडे ऊदाचीवाडी येथे राहण्यास आले होते.
advertisement
धमक्यांचे रूपांतर गोळीबारात
आरोपी पृथ्वीराज राठोड हा वारंवार फोन करून ती जागा आपल्या नावावर करून देण्यासाठी विकीला धमकावत होता. जागा नावावर न केल्यास जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. याच रागातून आरोपीने ऊदाचीवाडी येथे येऊन विकीवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. सुदैवाने गोळीचा नेम चुकला आणि विकी थोडक्यात बचावला.
सासवड पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी विकी रजपूत यानी सासवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पृथ्वीराज राठोड आणि उत्तरसिंग राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पुरंदर तालुक्यात सातत्याने होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, असा प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
