TRENDING:

Sunetra Pawar: "दादांचा सावलीसारखा सोबती गेला.."; विदीप जाधवांच्या पत्नीला भेटताच सुनेत्रा पवारांनाही दाटून आला कंठ, Video

Last Updated:

विदीप जाधव हे केवळ अंगरक्षक नव्हते, तर ते दादांच्या प्रत्येक प्रवासात, प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहायचे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
फलटण : महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. मात्र, या दुर्घटनेत केवळ एक नेताच गेला नाही, तर त्यांच्यासोबत सावलीसारखा वावरणारा एक निष्ठावंत रक्षकही काळाने हिरावून नेला. बुधवारी झालेल्या त्या भीषण विमान अपघातात दादांसोबतच त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही अंत झाला. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जाऊन जाधव कुटुंबियांची भेट घेतली, तेव्हा संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते.
सुनेत्रा पवारांनी घेतली जाधव कुटुंबाची भेट
सुनेत्रा पवारांनी घेतली जाधव कुटुंबाची भेट
advertisement

कर्तव्यावर असतानाच 'सावली' हरपली

विदीप जाधव हे केवळ अंगरक्षक नव्हते, तर ते दादांच्या प्रत्येक प्रवासात, प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहायचे. २८ जानेवारीच्या त्या काळरात्री नियतीने या निष्ठेवर घाला घातला. आज त्यांच्या घरी पोहोचल्यावर सुनेत्रा पवार यांनी विदीप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. विदीप यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना आणि कुटुंबियांना धीर देताना सुनेत्रा वहिनींचेही डोळे पाणावले होते. "दादा गेले आणि त्यांच्यासोबत त्यांचा विश्वासू साथीदारही गेला, हे दुःख शब्दांच्या पलीकडे आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

advertisement

भाड्याचे घर अन् मनाचा मोठेपणा

विदीप जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या साध्या राहणीमानाची सर्वत्र चर्चा होत आहे. राज्यस्तरावरील मोठ्या नेत्याचे अंगरक्षक असूनही ते विटावा येथील 'श्रीकृष्ण विहार'मध्ये एका साध्या भाड्याच्या घरात राहत होते. शेजाऱ्यांनी आणि मित्रांनी विदीप यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, "विदीप अत्यंत मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे होते. कामाचा कितीही ताण असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असायचे."

advertisement

तरडगाववर शोककळा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

आपल्या गावातील मुलगा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा रक्षक आहे, याचा तरडगावला सार्थ अभिमान होता. मात्र, आज त्याच मुलाच्या आठवणीने गावकरी गहिवरले आहेत. सुनेत्रा पवार यांनी जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत, शासन आणि पवार कुटुंब सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास दिला.

मराठी बातम्या/पुणे/
Sunetra Pawar: "दादांचा सावलीसारखा सोबती गेला.."; विदीप जाधवांच्या पत्नीला भेटताच सुनेत्रा पवारांनाही दाटून आला कंठ, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल