TRENDING:

Pune: 'ती पाण्याची बाटली द्या', बोट करून दाखवलं अन् महिलेनं तिकडे पाहताच कांड झालं, पुण्यातील घटनेचा VIDEO

Last Updated:

शिरूर तालुक्यातील तर्डोबाची वाडी, गोलेगाव रोड परिसरात भरदिवसा मंगळसूत्र चोरीची धाडसी घटना घडली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिरूर : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. कुठे मारामाऱ्या, चोरी आणि कोयत्या गँगने शहरात उच्छाद मांडला आहे.  अशातच पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये एका चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुकानात एकटी महिला पाहून चोरट्याने भर दिवसा मंगळसूत्र खेचून पळ काढला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शिरूर तालुक्यातील तर्डोबाची वाडी, गोलेगाव रोड परिसरात भरदिवसा दिवसा ही घटना घडली आहे. या भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. दुपारची वेळ आणि त्यातच उन्हाचा पारा जाास्त असल्यामुळे रहदारी कमी होती. त्यावेळी  हॉटेलच्या काउंटरवर बायसा सतीश खरबस (वय 40) या उभ्या होत्या.

[video width="738" height="554" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/punecctv-2026-03-c00866dca4ed9b474be6484a5e1ae8ad.mp4"][/video]

advertisement

दोन चोरटे पल्सर दुचाकीवर आले. एक जण बाहेर थांबला. त्याने दुचाकी रस्त्याच्या दिशेनं वळवली. तर दुसरा चोरटा हा हॉटेलच्या जवळ फोनवर बोलत गेला. हॉटेलमध्ये त्यावेळी एक ग्राहक होतं. ग्राहक जाण्याची वाट पाहत हा चोरटा बाहेरच थांबला. ग्राहक जसा केला तो हॉटेलच्या काउंटरवर जाऊन उभा राहिला. तोंडाला रुमाल बांधलेला हा चोरटा हॉटेलच्या काऊंटरवर उभा होता.

advertisement

पाण्याच्या बाटलीचा बहाणा अन् मंगळसूत्र खेचलं

त्याने पाण्याची बाटली मागण्याचा बहाणा केला.  बायसा सतीश खरबस यांनी कोणती बाटली पाहिजे अशी विचारणा केली, तेव्हा चोरट्याने फ्रीजकडे हात दाखवला, त्यावेळी फ्रीजकडे पाहण्यासाठी बायसा सतीश खरबस वळाल्या तीच संधी साधून चोरट्याने बायसा खरबस यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचलं आणि पळ काढला. जसा चोरट्याने पळ काढला तसा त्याचा पंटर बाईक सुरू करून पुढे आला आणि दोघांनी धूम ठोकली. पण बायसा खरबस ही महिला हॉटेलमधून जोरात पळत आली, पण तोपर्यंत दोन्ही चोरटे दुचाकीवरून सुसार पळून केले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
3 हजारांपासून सुरूवात, 15 कोटींचा उभारला व्यवसाय, अमरावतीच्या शेतकऱ्याला ऑक्सफर्डचं आमंत्रण, Video
सर्व पहा

बायसा खरवस ययांच्या गळ्यातील सुमारे 2 लाख 40 हजार रुपये किमतीचे 22 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र या चोरट्यांनी खेचून नेले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही चोर लाल-काळ्या पल्सरवरून शिरूरच्या दिशेने फरार झाले. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून शिरूर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune: 'ती पाण्याची बाटली द्या', बोट करून दाखवलं अन् महिलेनं तिकडे पाहताच कांड झालं, पुण्यातील घटनेचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल