राक्षस गण हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. ज्योतिषशास्त्राशी निगडित असलेल्या या शब्दाचा खरा अर्थ फारच कमी लोकांना माहिती आहे. राक्षस गणाविषयी असं मानलं जातं, की हा गण असलेल्या व्यक्तींना भुतांसारख्या नकारात्मक शक्तींची लगेच जाणीव होते. यामध्ये कितपत सत्य आहे, याची माहिती घेऊ या.
खरचं भूत दिसतं का?
राक्षस गण असलेल्यांना त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या नकारात्मक शक्तीची जाणीव होते. हा त्यांच्यातला नैसर्गिक गुण आहे. त्यामुळे त्यांना कधीकधी भुतं दिसतात; पण राक्षस गणाच्या व्यक्तींना नकारात्मक शक्तींची अजिबात भीती वाटत नाही. कारण हा गण असणाऱ्या व्यक्ती धाडसी असतात. प्रतिकूल परिस्थितीतही त्या घाबरत नाहीत. त्यामुळेच त्यांना जेव्हा नकारात्मक ऊर्जा जाणवते, तेव्हा त्या अस्वस्थ होत नाहीत, असं सांगितलं जातं.
advertisement
नक्षत्रांच्या आधारे ठरतो गण
ज्योतिषशास्त्रात नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा गण ठरवला जातो. ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म झाला आहे, त्यावरून त्याचा गण मानव, देव किंवा राक्षस यांपैकी नेमका कोणता आहे, हे ठरतं. ज्योतिषशास्त्रात एकूण 27 नक्षत्रं असून त्यापैकी कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका या 9 नक्षत्रांवर ज्या व्यक्ती जन्माला येतात, त्या व्यक्तीचा गण राक्षस असतो.
दरम्यान, ज्योतिषशास्त्रानुसार लग्न जुळवताना व्यक्तीचा गण विचारात घेतला जातो. देव आणि राक्षस गणाच्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करू नये. कारण या दोघांच्या स्वभावात खूप फरक असतो. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये वाद होण्याची शक्यता असते, असं मानलं जातं. तसंच राक्षस गणातल्या व्यक्तींबद्दल अनेकांचं मत वाईट असते; पण असं मत करून घेऊ नये. कारण प्रत्येक गणाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे.
प्रत्येक गणानुसार व्यक्तीमध्ये वेगवेगळे गुण आढळत असतात. त्यामुळेच ज्योतिषशास्त्रात देव, मानव व राक्षस या तिन्ही गणांना खूप महत्त्व आहे. अर्थात त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
Disclaimer: ( इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ज्योतिषाचार्यांनी आपली मतं व्यक्त केली आहे. त्या न्यूज18 मराठी सहमत नाही. न्यूज 18 मराठी अशा कोणत्याही धार्मिकतेवर आधारीत माहितीची हमी देत नाही.)
