महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे टाळावेत?
काळा रंग - सक्त मनाई
महाशिवरात्रीला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका. हिंदू धर्मात आणि विशेषतः शिवपुराणात काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. भगवान शंकराला काळा रंग अजिबात प्रिय नाही. असे मानले जाते की, या दिवशी काळे कपडे घातल्याने महादेवाचा क्रोध ओढवू शकतो आणि जीवनात आर्थिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या दिवशी काळ्या साड्या, शर्ट किंवा बांगड्या टाळाव्यात.
advertisement
गडद किंवा भडक रंगाचे कपडे
अतिशय भडक किंवा गडद रंगाचे कपडे या दिवशी आवर्जून टाळावेत. जांभळा किंवा अत्यंत भडक निळा रंग पूजेच्या वेळी टाळणे हिताचे ठरते. पूजा ही सात्त्विक असते, त्यामुळे शांत आणि सौम्य रंगांना प्राधान्य द्यावे.
पूजेसाठी कोणते रंग शुभ मानले जातात?
हिरवा रंग : हा महादेवाचा सर्वात आवडता रंग मानला जातो. बेलाचे पान, धतुरा आणि निसर्ग हिरवा असल्याने, या रंगाचे कपडे घातल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात.
पांढरा रंग : पांढरा रंग शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. महादेवाचे स्वरूपही 'कर्पूरगौरं' असल्याने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ ठरते.
केशरी किंवा पिवळा : हे रंग मांगल्याचे प्रतीक आहेत. कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेत हे रंग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
लाल रंग : विवाहित महिलांनी लाल रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करणे सौभाग्यकारक मानले जाते.
सुती कपड्यांना प्राधान्य: शक्य असल्यास रेशमी किंवा सुती कपडे परिधान करावेत. पूजेच्या वेळी चामड्याच्या वस्तू स्वतःजवळ ठेवू नका.
स्वच्छता महत्त्वाची: नवीन कपडे नसले तरी चालतील, पण जे कपडे तुम्ही परिधान कराल ते स्वच्छ आणि धुतलेले असावेत.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
