अयोध्या, 28 ऑक्टोबर : वैदिक ज्योतिष गणनेनुसार, 2023 वर्षातील अंतिम आणि दुसरे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रात्री 1:04 पासून सुरू होऊन 1:44 ला समाप्त होईल. वैज्ञानिक दृष्टीने चंद्रग्रहण लागण्याची घटना खगोलीय घटना मानली जाते. धार्मिक दृष्टिकोनातून ही घटना खूप महत्त्वाची आहे. चंद्र ग्रहणाच्या आधी सूतक काळ लागतो.
ज्योतिष शास्त्रानुसार 30 वर्षांनी कोजागिरी पौर्णिमच्या दिवशी चंद्र ग्रहण लागत आहे. हे चंद्रग्रहण भारतातही दिसेल. चंद्रग्रहणाच्या 9 तासआधी सूतक काळ लागेल. तर तेच सूर्यग्रहणाच्या 12 तासांपूर्वी सूतक काळ लागेल.
advertisement
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी सांगितले की, 28 ऑक्टोबरला रात्री 1 वाजून 4 मिनिटांनी चंद्र ग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण 1 वाजून 44 मिनिटांनी संपणार आहे. सूर्य ग्रहणात 12 तास आधी सूतक काळ लागतो. चंद्र ग्रहणाआधी 9 तास आधी सूतक काळ लागतो. जेव्हा सूर्य ग्रहण लागते तेव्हा कलयुगाचे आयुष्य 5000 वर्ष घटते. जेव्हा चंद्रग्रहण लागते तेव्हा अडीच हजार वर्ष कलयुगाचे आयुष्य घटते.
मंदिराचे कपाट बंद होण्याचे कारण काय?
चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. या दरम्यान, घरातील मंदिर अथवा आणि पूजेच्या ठिकाणी पडदा लावावा. मूर्तीला स्पर्श करणे टाळावे. यासोबतच घरात बसून मंत्रांचा जप करावा. चंद्रग्रहणाच्या वेळी यज्ञ हवन केल्यास अनेक पटींनी त्याचे फळ मिळते. चंद्रग्रहणाच्या वेळी घरातील मंदिर आणि पूजा 9 तास आधी बंद करायला हवी.
सूतक काळात वाढतो आसुरी शक्तींचा प्रभाव -
धार्मिक ग्रंथांमध्ये चंद्र ग्रहणाशी संबंधित अनेक नियमांचे वर्णनही केले गेले आहे. अशी मान्यता आहे की, या दरम्यान, पूजा-पाठ, भगवानाची मूर्तींना स्पर्श, ग्रहणादरम्यान झोपणे हे वर्जित असते. या दरम्यान, मंदिराचे कपाटही बंद केले जातात. असे मानले जाते की, कोणत्याही ग्रहण काळात आसुरी शक्तींचा प्रभाव वाढतो आणि दैवी शक्तींचा प्रभाव कमी होतो. म्हणून, ग्रहण काळात शांतपणे मंत्रांचा जप केला जातो आणि देवाचे ध्यान केले जाते.
घरात मंदिर असेल तर या गोष्टींकडे लक्ष द्या -
1. सुतक आधी मंदिराची स्वच्छता करावी.
2. सुतक आधी घरातील मंदिरात संध्याकाळची आरती करावी.
3. शक्य असल्यास सुतक काळापूर्वी देवाला पूर्ण नैवेद्य दाखवावा.
4. सुतक काळ सुरू होण्यापूर्वी मंदिराचे दरवाजे बंद करावेत आणि नंतर कोणत्याही परिस्थितीत दरवाजे उघडू नयेत.
5. भगवान कृष्णाजवळ (लड्डू गोपाल) तुळशीची पाने आणि पाणी अवश्य ठेवावे.
(सूचना: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रानुसार आहे, न्यूज 18 याबाबत कोणताही दावा करत नाही)
