यंदा तसेच पहिल्यांदा भाविकांना गाभाऱ्यात बसून अभिषेक करता येणार नसल्याचे भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठू बारगळ यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. उद्याच्या शनिवारपासून सोमवारपर्यंत, भाविकांना घृष्णेश्वराचाही अभिषेक करता येणार नाही, हा एक मोठा बदल देखील करण्यात आला.
advertisement
घृष्णेश्वराला श्रावणातील पहिला अभिषेक रविवारी रात्री 12 वाजता होणार आहे. यानंतर नैमित्तिक पारंपरिक अभिषेक मंदिर विश्वस्त करतील. मात्र, सर्वांना दर्शन घडावे म्हणून शनिवार, रविवार आणि सोमवारी अभिषेक करता येणार नाही. याव्यतिरिक्त मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी भाविकांना गाभाऱ्यात अभिषेक करता येणार असल्याची माहिती घृष्णेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष योगेश टोपरे यांनी सांगितले.
श्रावण महिन्यात प्रत्येक शनिवारी खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात दर्शनानिमित्त भाविकांची अलोट गर्दी होते. यामुळे वाहतूक कोंडी होते. हे मार्ग राहणार बंद नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट (मध्यम आणि जड वाहनांसाठी) दौलताबाद टी पॉइंट ते दौलताबाद घाट गेट मार्ग (सर्व प्रकारच्या वाहनांसाठी) छत्रपती संभाजीनगरकडून नाशिक-धुळे जाणारी मध्यम आणि जड वाहने भगवान महावीर चौक, नगर नाका, एएस क्लब, करोडीमार्गे नवीन धुळे-सोलापूर हायवेने जांभाळा, कसाबखेडा फाटा, वेरूळमार्गे जातील. नाशिक -धुळ्याकडून शहरात येणारी मध्यम आणि जड वाहने वेरूळ, कसाबखेडा फाटा, एएस क्लब मार्गाने जातील.