पुणे : पुण्याच्या प्राचीनत्वाची ग्वाही देणारे ठिकाण म्हणजे दगडी नागोबा देवस्थान. पुण्यातील गणेश पेठ आणि रविवार पेठ यांच्या हद्दीवर नागझरीकाठी असणारे हे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातून समोरील ऋणमुक्तेश्वर शिवमंदिराचा गाभारा दिसतो. तर या मंदिराचा एकूणच इतिहास काय आहे? या विषयीचीचं माहिती मंदिराचे व्यवस्थापक संतोष कडेकर यांनी दिली आहे.
advertisement
काय आहे इतिहास?
पुणे शहरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे ठिकाण आहेत. ज्यामधून पुण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडते आणि पुण्याची ओळख करून देणारी ती ठिकाण आहेत. त्याच प्रमाणे गणेशपेठ इथे असलेलं दगडी नागोबा मंदिर. नाग आणि नागीण देवता सोबत असणार हे मंदिर आहे. या मंदिराचा एकूण इतिहास हा 750 वर्ष जुना आहे आणि ही मूर्ती स्वयंभू असल्याचं ही सांगितलं जातं, असं मंदिराचे व्यवस्थापक संतोष कडेकर सांगतात.
शनिदेवाला या 5 वस्तू खूपच आवडतात, साडेसातीमधून होईल नक्की सुटका, फक्त इतकं काम करा
यात्रेला 150 वर्षाचा इतिहास
पाच पिढ्या झालं आम्ही या मंदिराची सेवा करण्याचं काम करत आहोत. 750 वर्ष झालं या ठिकाणी नागोबाच वास्तव्य आहे. नागझरी काठी पूर्वी जिवंत नागनागीन असायची परंतु कालांतराने लोकसंख्या वाढली आणि ते अदृश्य झाले. 1797 साली आमची पणजी सखुबाई कडेकर यांना साक्षात्कार झाला त्यानंतर त्यांनी संपूर्ण मंदिर दगडात उभं करून त्याची मूर्ती स्वरूपात स्थापना केली. याच वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराच्या समोर ऋणमुक्तेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या गाभाऱ्यातून नागदेवतेचे दर्शन होते.
तब्बल 3 राजयोग 5 राशींचं नशीब चमकवणार! खूप ऊन सोसलं, मे अखेरीस गारवा मिळणार
तसेच सूर्य उगवताना त्याची किरणे महादेवाच्या पिंडीवर पडतात आणि सूर्य मावळताना नागदेवतेच्या मूर्तीवर पडून सूर्य मावळतो. तर नागपंचमीच्या काळात या ठिकाणी मोठी यात्रा देखील भरवली जाते. या यात्रेला 150 वर्षाचा इतिहास आहे. उत्सवात परिसरातील नागरिकांचा सहभाग असतो. ज्यांना हे ठिकाण माहीत आहे, असे राज्यभरातील भाविक या ठिकाणाला भेट देतात, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक संतोष कडेकर यांनी दिली आहे.