काय आहे या मंदिराचा इतिहास?
बीड शहरापासुन तीन किलोमीटर अंतरावरील शिदोड गावात महालक्ष्मीचे पुरातन मंदिर असल्याने गावाला देवीचे शिदोड असेही म्हणतात. 1748 मध्ये निरंतर यांनी या मंदिराचा जिर्णोध्दा केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलेले आहे.
परशुरामाला डोंगरावर झाले मातेचे दर्शन; पाहा काय आहे रेणुकादेवीची आख्यायिका Video
advertisement
अशी सांगितली जाते आख्यायिका
बीडचे रहिवासी असणारे शिदोजी देशमुख हे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीचे मोठे भक्त होते. ते बीडचे निजामकालीन वतनदार होते. ते महिन्याला कोल्हापूरची वारी करत होते. प्रत्येक महिन्याला ते कोल्हापूरला दर्शनासाठी जात होते. ते जातांना बार्शी मार्गे सोलापूरला जात होते. आणि येत्याना पंढरपूर मार्गे तुळजापूर परत बीडला येत होते. परंतु काही काळानंतर वयामानानुसार त्यांना दर्शनासाठी जाणे होत नव्हते. मग त्यांनी देवीकडे जाऊन प्रार्थना केली माझे येणे होणार नाही तू माझ्या भेटीला येशील का? तेव्हा देवी प्रसन्न झाली.
त्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन ते बीडकडे परतत होते. तेव्हा ते तुळजापूर मार्गे बीडकडे येत होते तेव्हा त्यांना देवीने सांगितले की मी तुझ्यासोबत येत आहे मात्र तू जर पाठीमागे वळून पाहिले त्याच जागी मी स्थायिक होईल. त्यानंतर शिदोची देशमुख हे शिदोड या गावी आल्यानंतर त्यांनी सहज पाठीमागे वळून पाहिले आणि शिळेच्या माध्यमातून देवी त्या ठिकाणी थांबली आणि तेव्हापासून हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरानंतर शिदोडची देवी हे उपपीठ असल्याची आख्यायिका सांगितली जाते, असं इतिहासकार प्रताप शेंडगे सांगतात.
भक्ताची एक चूक अन् थेट खडकातून प्रकट झाली देवी, खंडेश्वरी मातेची कथा माहितीये का?
नवरात्र उत्सवात कार्यक्रमाचे आयोजन
नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज पहाटे पाच वाजता देविला महाभिषेक आणि महापूजा त्यानंतर काकड आरती केली जाते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारासमध्ये महापूजा रोज रात्री आरती नित्यनियमाने देवीची पूजा केली जाते, असं प्रताप शेंडगे सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)