भक्ताची एक चूक अन् थेट खडकातून प्रकट झाली देवी, खंडेश्वरी मातेची कथा माहितीये का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
प्रत्येक देवी देवतांच्या मंदिरासोबत एखादी आख्यायिका जोडलेली असते. बीड वासियांचं ग्रामदैवत असणारी खंडेश्वरी माता चक्क दगडातून प्रकट झाली.
बीड, 12 ऑक्टोबर: नवरात्री उत्सवाचे नऊ दिवस शक्ती देवतेच्या उपासनेचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात गावोगावी असणाऱ्या ग्रामदेवींच्या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते. या देवी देवतांच्या मंदिरासोबत काही आख्यायिका आणि मान्यता जोडल्या गेलेल्या असतात. बीडचे ग्रामदैवत खंडेश्वरी देवी हे बीडकरांचं श्रद्धास्थान आहे. नवरात्री उत्सवाच्या काळात या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी असते. मंदिराबाबत एक खास आख्यायिका असून मंदिर अभ्यासक विकास गाडेकर यांनी याबाबत माहिती दिलीय.
बीडचे ग्रामदैवत खंडेश्वरी
बीडपासून काही अंतरावर असणारे खंडेश्वरी मंदिर हे संपूर्ण बीड वासियांचे ग्रामदैवत आहे. खडकाळ डोंगरावर हे मंदिर आहे. मंदिराचा परिसर जवळपास आठ एकराचा आहे. यात खंडेश्वरी देवीचं दगडी बांधकामाचं आकर्षक मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी अशी भक्तांची मान्यता आहे. मार्गशीर्ष महिना आणि नवरात्री उत्सवाच्या काळात हा परिसर भक्तांनी गजबजलेला असतो. या मंदिराबाबत अनोखी आख्यायिका सांगितली जाते.
advertisement
दगडातून प्रकट झाली देवी
खंडेश्वरी देवीबाबत एक आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. काळोबा वीर नावाचा मेंढपाळ मंदिर परिसरात वास्तव्यास होता. त्याचा मुख्य व्यवसाय मेंढपाळण हाच होता. दर पौर्णिमेला काळोबा वीर माहूरच्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी जात. वयामानाने ते थकले. घोड्यावर बसता येईना. यामुळे त्यांना दर्शनासाठी जाता आले नाही. मात्र, शेवटचे दर्शन घ्यावे यासाठी काळोबा वीर माहूरला गेले. देवीसमोर प्रार्थना की, यापुढे मी दर्शनासाठी येऊ शकणार नाही. तेवढ्यात देवीने साक्षात्कार देऊन काळोबा वीर यांना सांगितले, मी तुझ्या सोबत येते मात्र, तु पूढे चाल मागे वळून पाहू नकोस. जर मागे पाहशील तर त्याच ठिकाणी मी थांबेन, असं देवीनं सांगितलं.
advertisement
काळोबा वीर देवीने सांगितल्यानुसार पुढे चालू लागला. मात्र काही अंतर चालल्यावर काळोबा वीरच्या मनात शंका आली. देवी खरच आपल्यामागे येते का हे पाहण्यासाठी तो मागे वळता. देवी त्याच ठिकाणी अदृश्य झाली आणि खडकाळ दगडातून स्वयंभू मूर्ती प्रकट झाली, असं ग्रामस्थ सांगतात.
advertisement
नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासन सज्ज
बीड वासियांचे ग्रामदैवत असल्यामुळे पंचक्रोशीतील नव्हे तर जिल्हाभरातून भाविक भक्त या खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतात. दहा दिवसांत या मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप येते. यंदा मंदिर परिसरात तब्बल 31 सीसीटीव्ही कॅमेरांची नजर असणार आहे. यासह विद्युत सुविधा, पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधा या सर्व गोष्टींची उपलब्धता करण्यात आली आहे, असे मंदिर समितीचे अध्यक्ष राणा चव्हाण सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
October 12, 2023 10:47 AM IST
मराठी बातम्या/Temples/
भक्ताची एक चूक अन् थेट खडकातून प्रकट झाली देवी, खंडेश्वरी मातेची कथा माहितीये का?