India vs Pakistan मॅच होणार, बहिष्कारानंतर मोहसीन नक्वीला लाज, म्हणून बांगलादेशने केली घोषणा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत आणि पाकिस्तान सामन्यातील बहिष्काराच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. त्यामुळे आता श्रीलंकेच्या कोलंबोतील आर प्रमेदासा स्टेडिअममध्ये येत्या 15 फेब्रुवारी 2026 चा हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे.
India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान सामन्यातील बहिष्काराच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. त्यामुळे आता श्रीलंकेच्या कोलंबोतील आर प्रमेदासा स्टेडिअममध्ये येत्या 15 फेब्रुवारी 2026 चा हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. विशेष म्हणजे या गोष्टीची पाकिस्तान सरकार किंवा पाकिस्तान बोर्डाकरून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. पण ज्या बांगलादेशमुळे पाकिस्तानने भारताविरूद्ध ही भूमिका घेतली.त्या बांग्लादेश बोर्डाचे अध्यक्ष अमीनुस इस्लाम बुलबुल यांनी एक पत्रक जारी करून पाकिस्तानने भारतासोबत टी20 वर्ल्ड कप मॅच खेळावा असे म्हटले आहे. एकंदरीत त्यांनी ही घोषणाच केल्याचे स्पष्ट होते.
बांग्लादेश बोर्डाच्या पत्रात काय?
पत्राच्या सुरुवातीला बांगलादेश बोर्डा (BCB)कडून PCB, ICC आणि सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करण्यात आले. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB), अलीकडील आव्हानांवर मात करण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB), आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि सर्व संबंधितांचे मन:पूर्वक आभार मानत आहे.
BCB President Md Aminul Islam says: “Following my short visit to Pakistan yesterday and given the forthcoming outcomes of our discussions, I request Pakistan to play the ICC T20 World Cup game on 15 February against India for the benefit of the entire cricket ecosystem.” pic.twitter.com/fyvP9awdH3
— ANI (@ANI) February 9, 2026
advertisement
"या कठीण काळात बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या प्रयत्नांमुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आमचा हा बंधुभाव असाच बहरत राहो." काल माझ्या पाकिस्तानच्या संक्षिप्त दौऱ्यांनंतर आणि आमच्या चर्चेतून समोर येणाऱ्या सकारात्मक निष्कर्षांचा विचार करता, मी पाकिस्तानला विनंती करतो की, संपूर्ण क्रिकेट जगताच्या फायद्यासाठी त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा ICC T20
advertisement
वर्ल्डकप सामना खेळावा,असे बांगलादेश बोर्डाचे अध्यक्ष मो. अमिनुल इस्लाम यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानने केलेल्या सर्व मागण्या आयसीसीने फेटळल्यानंतरही आता मोहसीन नक्वी यांना घोषणा करण्याची लाज येते आहे.त्यामुळे अमिनुल इस्लाम यांच्याद्वारे हे पत्रक काढून घोषणेची औपचारीकता करण्यात आली आहे.त्यानंतर कदाचित पाकिस्तान बांगलादेशला विनंती मान देऊन भारताविरूद्ध खेळण्यास तयार येईल,असेच चित्र दिसते. जेणकरून कसं बांगलादेश बोलला म्हणून आम्ही खेळण्यास तयार झालो आमची स्वत:ची काही इच्छा नाही आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 11:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
India vs Pakistan मॅच होणार, बहिष्कारानंतर मोहसीन नक्वीला लाज, म्हणून बांगलादेशने केली घोषणा








