मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर मोठी कारवाई, लीलावतीच्या कार्यकारी संचालक पदावरून उचलबांगडी
- Published by:Prashant Gomane
- Reported by:PRASHANT BAG
Last Updated:
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक पदावरून केलं बडतर्फ करण्यात आलं आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक पदावरून केलं बडतर्फ करण्यात आलं आहे. परमबीर सिंग यांनी लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांविरोधात कथित 1200 कोटींच्या घोटाळ्याबातत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर परमबीर सिंग यांची जुलै 2024 मध्ये लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर परमबीर सिंग यांच्यामुळे रुग्णालयात मोठा वाद निर्माण झाला होता. कारण रुग्णालयातील डॉक्टरांकडे त्यांच्या पदोन्नतीसाठी प्रत्येकी 25 लाख खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप झाला होता.तसेच परमबीर सिंग यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत डॉक्टरांवर कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे रुग्णालयात अंतर्गत अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा लीलावती रुग्णालयाच्या विश्वस्तांनी केला होता.
advertisement
तसेच परमबीर सिंग यांच्या कार्यकाळात खंडणी, धमकावणे आणि अधिकाराचा गैरवापर केल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या तक्रारींची छाननी केल्यानंतर विश्वस्तांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं.
परमबीर सिंग यांनी बडतर्फ होण्यापूर्वीच लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात 1200 कोटींच्या कथित आर्थिक घोटाळ्याची तक्रार दाखल केली होती. आणि त्यांची बडतर्फी ही सूडबुद्धीने केल्याचा दावा सिंग यांनी केला होता. या निर्णयाला सक्षम यंत्रणेपुढे कायदेशीर आव्हान देणार असल्याचे सांगितले होते.
advertisement
दरम्यान परमबीर सिंग यांची जुलै 2024 मध्ये 5 वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र हा कार्यकाळ मुदतीपूर्वीच संपुष्टात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 11:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर मोठी कारवाई, लीलावतीच्या कार्यकारी संचालक पदावरून उचलबांगडी









